तेलंगणाचे कृषीमंत्री बारामतीत दाखल; जाणून घेतले शेतीचे अधुनिक तंत्र

| Updated on: Nov 05, 2020 | 6:56 PM

तेलंगणा राज्याचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी आज (5 नोव्हेंबर) बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रास भेट दिली. बारामती भागातील कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रास भेट देऊन शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधूनिक तंत्रज्ञानाची प्रशंसा केली.

तेलंगणाचे कृषीमंत्री बारामतीत दाखल; जाणून घेतले शेतीचे अधुनिक तंत्र
Follow us on

पुणे : तेलंगणा राज्याचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी आज (5 नोव्हेंबर) बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रास भेट दिली. बारामती भागातील कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी  कृषी विज्ञान केंद्रास भेट देऊन शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधूनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली. तसेच, नव्या तंत्रज्ञानाची प्रशंसादेखील केली. (Telangana Agriculture Minister arrives in Baramati to study modern agricultural technology)

देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांची राजकीय कारकीर्द आणि बारामती तालुक्याचा जवळचा संबंध आहे. बारमतीमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी अनेकजण या शहराला वेळोवेळी भेट देतात. यावेळी तेलंगणा राज्याचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. या भागातील आधुनिक शेती, तेसच कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ते येथे आले होते. त्यांनी कृषी विज्ञान केंद्रास भेट देऊन शेतीसाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. यावेळी त्यांच्यासोबत शेतीवर अभ्यास करणारे शिष्टमंडळदेखील होते.

त्यांनी पुणे जिल्ह्यातील भौगोलिक माहिती, येथील मृदा व पाण्याची स्थिती जाणून घेतली. तसेच येथील जिवाणू प्रयोगशाळा, माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळेलाही भेट देऊन माती परिक्षणाची आधूनिक पद्धत समजून घेतली. विज्ञान केंद्रातील भाजीपाला उच्च गुणवत्ता केंद्रासही त्यांनी यावेळी भेट दिली. तसेच मधूमक्षीकापालन आणि शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील याविषयीच्या तांत्रिक बाबीदेखील त्यांनी आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाने समजून घेतल्या.

यावेळी कृषी विज्ञान केंद्राला भेट दिल्यानंतर येथील नाविन्यपूर्ण उपक्रमांची एस. निरंजन रेड्डी यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले, “तेलंगणा राज्याची निर्मीती होऊन 6 वर्षे झाले. आमचे राज्य शेतीप्रधान आहे. आमच्या राज्यात शेतीसाठी वेगवेगळ्या सुविधा आहेत. आणखी कोणत्या गोष्टींमध्ये प्रगती करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार देशाचे कृषीमंत्री होते. त्यांनी देशासाठी खूप काही केलं. ते माजी कृषामंत्री असल्यामुळे आम्ही हा परिसर भेट देण्यासाठी निवडला. हा परिसर कधीकाळी दुष्काळग्रस्त होता. पण, आता येथे शेती व्यावसायाने चांगला जम पकडला आहे. त्याचाच अभ्यास करायला आम्ही इथे आलो आहोत.”

दरम्यान, येथील कृषी विज्ञान केंद्राचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाला कृषी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण सहकार्य केले. त्यांनी शेतीचे आधूनिक आणि नवनवे तंत्रज्ञान तेलंगणाच्या शिष्टमंडळाला समजाऊन सांगितले.

संबंधित बातम्या :

एफआरपी थकवणाऱ्यांचे साखर कारखाने बंद पाडणार; स्वाभिमानीचा साखर कारखानदारांना इशारा

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, कोल्हापूर, बुलडाणा, जळगावात चक्काजाम

अतिवृष्टीमुळे कीड लागल्याने हवालदिल शेतकऱ्यांची द्राक्ष बागांवर कुऱ्हाड; लाखो रुपयांचे नुकसान

(Telangana Agriculture Minister arrives in Baramati to study modern agricultural technology)