आत्ता लोकांचे जीव वाचवणं गरजेचं, तेलंगणा मुख्यमंत्र्यांची मोदींकडे लॉकडाऊन वाढवण्याची विनंती

| Updated on: Apr 06, 2020 | 11:58 PM

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील लॉकडाऊनचा कालवधी वाढवण्याची विनंती केली आहे (K Chandrashekhar Rao request to extend lockdown).

आत्ता लोकांचे जीव वाचवणं गरजेचं, तेलंगणा मुख्यमंत्र्यांची मोदींकडे लॉकडाऊन वाढवण्याची विनंती
Follow us on

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील लॉकडाऊनचा कालवधी वाढवण्याची विनंती केली आहे (K Chandrashekhar Rao request to extend lockdown). देशातील लॉकडाऊन 14 एप्रिलला संपत आहे. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर राव यांनी ही मागणी केली आहे. आपल्यासमोर याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही, असंही ते यावेळी म्हणाले. आपल्याला आधी लोकांचे जीव वाचवायला हवेत आणि मग नंतर अर्थव्यवस्था वाचवता येईल, असंही त्यांनी नमूद केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषिक केला. आता हा लॉकडाऊन संपायला केवळ 8 दिवस बाकी आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशातील कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचाही आकडा वाढतो आहे. त्यामुळेच कोरोनाचा पुढील धोका लक्षात घेऊन लॉकडाऊन वाढवण्याची मागणी जोर पकडत आहे. स्वतः पंतप्रधान मोदींनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे याबाबत सुचना मागितल्या आहेत.

केंद्र सरकारने अद्याप लॉकडाऊन कधी हटवणार यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. सद्य परिस्थितीवर सरकारचं लक्ष आहे आणि योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असं मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे.

के. चंद्रशेखर राव म्हणाले, “लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. तेलंगणाला प्रत्येक दिवशी 400 ते 450 कोटींचा तोटा होत आहे. एप्रिलच्या 4 दिवसांमध्ये 2,400 कोटी रुपयांचं उत्पन्न होणं अपेक्षित होतं, मात्र केवळ 4 कोटींचं झालं. असं असलं तरी आपल्याला लॉकडाऊनशिवाय सध्यतरी दुसरा पर्याय नाही. आपल्या देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असताना हाच पर्याय योग्य आहे.”

मागील 24 तासात देशातील कोरोना रुग्णांनी 4000 चा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 111 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना हे मोठं जागतिक संकट आहे. जवळपास 22 देशांनी संपूर्ण लॉकडाऊन केला आहे आणि 90 देशांनी काही प्रमाणात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. बोस्टोन कन्स्ल्टिंग ग्रुपने कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी 3 जूनपर्यंत लॉकडाऊनची शिफारस केली आहे. लॉकडाऊनचा निर्णय योग्य राहिल.”

संबंधित बातम्या:

Corona Update | देशात 4 हजारांवर रुग्ण, 109 मृत्यू, 25 हजार तब्लिगी क्वारंटाईन, राज्यांना 3 हजार कोटी

खासदारांच्या वेतनात 30 टक्के कपात, दोन वर्ष खासदार फंडही नाही, मोदी सरकारचा मोठा निर्णय

कोरोनाविरुद्धची लढाई प्रदीर्घ, पंतप्रधान मोदींचे स्पष्ट संकेत, जनतेने दाखवलेल्या गांभीर्य-एकजूटीचंही कौतुक

K Chandrashekhar Rao demand to extend lockdown