दादरचे भाजी मार्केट पूर्णपणे बंद, गर्दी आटोक्यात येत नसल्याने प्रशासनाचा निर्णय
गडचिरोली : राज्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत (Temple Donate 50% money) आहे. त्याचे परिणाम भारतासह इतर देशांवरही होताना दिसत आहे. प्रत्येक देश आपपल्या पद्धतीने त्याच्यावर मात करण्यात प्रयत्न करीत आहे. देशावर सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट आलं आहे. त्यामुळे “राज्यातील सर्व मंदिरांनी दानाच्या स्वरुपात जमा झालेली 50 टक्के रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावी,” अशी मागणी करणारे पत्र एका 12 वर्षाच्या मुलीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
अपेक्षा शाम रामटेके असे या मुलीचे नाव आहे. ही मुलगी सातवीत (Temple Donate 50% money) असून ती जवाहर नवोदय विद्यालयात शिकते.
“लॉकडाऊनमुळे देशातील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. असंघटीत कामगार, रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि इतर वर्गांना सरकार मदत करत आहे. पण अद्याप बऱ्याच भागात ती पोहोचलेली नाही. सरकारने मदतीसाठी लोकांकडे आवाहन केले आहे. अनेक समाजिक संघटनांसह, मोठे उद्योगपती, सेलिब्रिटी यासारखे मदतीसाठी पुढे आले आहे.”
“देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे आपल्याला आरोग्य सेवा मजबूत करावी लागणार आहेत. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे जनतेलाही मदतची आवश्यकता आहे. अशाप्रकारे देश दुहेरी संकटात सर्व मंदिरात दानाच्या स्वरुपात खूप पैसा जमा होतो.”
नागपुरात पोलिसाच्या पत्नीची हत्या, मुलाच्या मित्राचा चाकूहल्ला https://t.co/My0XLFLeG0
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 5, 2020
“देशात संकट असताना भाविकांनी देवाला सुरक्षित ठेवण्यासाठी दिलेल दानाचा काही तरी उपयोग झाला पाहिजे. यामुळे मंदिरात दानाच्या स्वरुपात जमा झालेल्या निधीतील 50 टक्के रक्कम ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावी,” असे अपेक्षाने पत्रात लिहिले (Temple Donate 50% money) आहे.
संबंधित बातम्या :
रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज, पुण्यात ‘कोरोना’ग्रस्त महिलेचा मृत्यू