जळगावमध्ये क्रूझर आणि डंपरचा भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी

| Updated on: Feb 03, 2020 | 9:40 AM

येवला तालुक्यातील हिंगोणाजवळ क्रूझर आणि डंपरच्या धडकेत 10 जणांचा मृत्यू झाला (Jalgaon accident) आहे. तर एकूण सात जण जखमी आहेत.

जळगावमध्ये क्रूझर आणि डंपरचा भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी
Follow us on

जळगाव : येवला तालुक्यातील हिंगोणाजवळ क्रूझर आणि डंपरच्या धडकेत 10 जणांचा मृत्यू झाला (Jalgaon accident) आहे. तर एकूण सात जण जखमी आहेत. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु (Jalgaon accident) आहेत.

स्वागत समारंभाचा कार्यक्रम आटोपून घराकडे परतत असताना हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे.

महाजन आणि चौधरी कुटुंबातील लोक रात्री बारा ते साडेबारा दरम्यान मुक्ताईनगर येथून कौटुंबिक कार्यक्रम आटोपून निघाले होते. दरम्यान प्रवासातच क्रूझर आणि डंपरची भीषण धडक होऊन हा अपघात झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. जखमींना येवलामधून जळगावमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

मृतांची नावं

मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (वय 65), प्रभाकर उर्फ बाळू नारायण चौधरी (वय 60), प्रभाबाई प्रभाकर चौधरी (वय 40), आश्लेषा उमेश चौधरी (वय 28), रिया जितेंद्र चौधरी (वय 21), सोनाली जितेंद्र चौधरी (वय 34), प्रियांका नितीन चौधरी (वय 29) हे सर्व मुक्ताईनगर येथे राहणारे आहेत. तर सोनाली सचिन महाजन (वय 34), सुमनबाई श्रीराम पाटील (वय 55) आणि संगीता मुकेश पाटील (वय 40) हे रावेर येथे राहणारे आहेत.

जखमींची नावं

सर्वेश नितीन चौधरी (वय 9) , शिवम प्रभाकर चौधरी, मीना प्रफुल चौधरी (वय 30), सुनिता राजाराम पाटील, धनराज गंभीर कोळी (क्रूझर चालक) हे चिंचोल येथे राहतात. आदिती मुकेश पाटील ही निंबोल येथे राहते. तसेच डंपर चालक मुकुंदा गणेश भंगाळे हे यावल येथे राहतात.

सांगली जिल्ह्यातही भीषण अपघात

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात झरेगावजवळ एक चारचाकी गाडी विहिरीत कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातामध्येही 5 जणांचा मृत्यू झाला असून यात 2 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे.

मच्छिंद्र पाटील (60), कुंडलीक बरकडे (60), गुंडा डोंबाळे (35), संगीता पाटील (40) आणि शोभा पाटील (38) अशी सांगली येथील अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावं आहेत.

पुण्यातही रिक्षा-दुचाकीचा अपघात

दुसरीकडे पुण्यात देखील टिळक रोड येथे भरधाव दुचाकीने रिक्षाला धडक दिली आणि त्यानंतर थेट पीएमटी बसखाली आली. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.