ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयातील 125 पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले (Thane Corona police Discharged) आहे. ठाण्यातील 15 पोलीस अधिकारी आणि 110 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे आता 3 पोलीस अधिकारी आणि 62 कर्मचारी विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान या सर्व पोलिसांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
कोरोनाच्या विषाणूच्या कचाट्यात सापडलेले अनेक पोलीस कर्मचारी कोरोनाला हरवून सुखरुप घरी परतत आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत 192 जण कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 18 पोलीस अधिकारी आणि 174 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तर एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
सुदैवाने ठाण्यातील 125 पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. यात 15 पोलीस अधिकारी आणि 110 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोना योध्यांचे स्वागत…
कोरोनाला हरवून पुन्हा ठाणेकरांच्या सेवेसाठी ठाणे पोलीस दलातील #CoronaWarriors कर्तव्यावर हजर.
आपणास पुढील वाटचालीस आरोग्यमय हार्दिक शुभेच्छा… pic.twitter.com/a8yAg9vGNo— Thane City Police (@ThaneCityPolice) June 6, 2020
तर आतापर्यंत 65 पोलिसांवर अद्याप कोरोनावर उपचार सुरु आहेत. यात 3 अधिकारी आणि 62 कर्मचारी आहेत. त्यांच्यावर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सर्व पोलिसांची प्रकृती स्थिर आहे. ते लवकरच बरे होऊन कर्तव्यावर रुजू होतील, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला (Thane Corona police Discharged) आहे.
संबंधित बातम्या :
97 वर्षाच्या आजीची कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी, केवळ सात दिवसात डिस्चार्ज
कोरोना पॉझिटिव्ह नर्सला घेऊन परिचारिकांची डीनच्या केबिनमध्ये धडक, केईएम रुग्णालयात आंदोलन