मुंबई : ‘मैने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून 2002 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री समीरा रेड्डी आता पुन्हा एकदा दुसऱ्या मुलासाठी गर्भवती असल्याचे समोर आलं आहे. नुकतेच एका शो दरम्यान ती गर्भवती असल्याचे दिसले. 38 वर्षाच्या वयात समीरा पुन्हा एकदा आई होणार आहे. एका फॅशन शोच्या कार्यक्रमात ती दिसली तेव्हा समीरा गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.
आतापर्यंत अनेक चित्रपटात समीराने काम केलं आहे. समीराने 2014 मध्ये उद्योगपती अक्षय वरडेसोबत लग्न केलं. 25 मे 2015 रोजी तिने आपल्या मुलाला जन्म दिला. आता ती दुसऱ्या मुलासाठी तयारी करत आहे. त्याची डिलिव्हरी जुलैमध्ये होईल.
नुकतेच पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये ती आली होती. तीने व्हाईट टी शर्ट, ब्लॅक पँट आणि ग्रीन कार्डिगन घातले होते. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे स्पष्ट दिसत होते. मात्र आतापर्यंत समीराने याबद्दल काही सांगितले नाही.
एका वेबसाईटला काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये तीने गर्भवती असल्याचे कबूल केले होते की, मी पुन्हा आई होणार आहे. त्यावेळी तीने डिलिव्हरीची वेळही सांगितली होती. लग्न आणि मुलांच्यानंतर समीरा चित्रपटांपासून लांब आहे.