पुणे : पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Pune Private Doctor) आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. पुण्यात आता खासगी डॉक्टरांनाही कोव्हिड 19 सेंटर, कोव्हिड 19 रुग्णालयात 15 दिवस सेवासक्ती द्यावी लागणार आहे. जे डॉक्टर सेवा देणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी (Pune Private Doctor) दिले आहेत.
पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खासगी डॉक्टरांना आता कोव्हिड 19 सेंटरमध्ये सक्तीने 15 दिवस सेवा द्यावी लागणार आहे. या आदेशातून 55 वर्षांवरील आणि काही आजार असलेले डॉक्टर वगळण्यात आले आहेत. तुम्ही कुठे सेवा देणार यासंदर्भात येत्या तीन दिवसात डॉक्टरांनी माहिती द्यावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
पुणे शहरात सध्या कोव्हिड 19 सेंटर वाढवण्यात आले असून त्यासाठी पालिकेकडे डॉक्टरांची पुरेशी उपलब्धता नाही. त्यामुळे खासगी डॉक्टरांना आता 15 दिवस सेवा द्यावी लागणार आहे. यासंदर्भात पुणे, पिंपरी पालिका आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (18 जुलै) दिवसभरात 1904 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्याची आकडेवारी 46 हजार 872 वर पोहचली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात दिवसभरात 29 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या 1243 वर पोहचली. शुक्रवारी दिवसभरात 773 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 21 हजार 107 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
संबंधित बातम्या :
पुण्यात कोरोनाबाधितांवर घरीच उपचार, ‘त्या’ पॉझिटिव्ह रुग्णांनाही घरीच पाठवणार
Pune Lockdown | पुणेकरांकडून वारंवार नियमांचं उल्लंघन, 13 दिवसात तब्बल 8,097 नागरिकांवर कारवाई