नागपूर : देशात पावसाळ्याचा हंगाम आता पुढे सरकतोय, त्यामुळेच हवामान विभागानं मान्सूनच्या आगमनाचं वेळापत्रकंच बदललं आहे. म्हणजे पूर्वी नागपुरात मॉन्सून आगमनाची तारीख 9 जून होती, आता ती तारीख 16 जून करण्यात आली आहे. देशातील विविध भागात अशाच प्रकारे मान्सून आगमनाची तारखी हवामान विभागाकडून बदलण्यात आली आहे. (Monsoon new calendar )
पूर्वीच्या तुलनेत सरासरी पाच ते सहा दिवस मान्सून आगमनाची तारीख पुढे सरकली आहे. पूर्वी 1901 ते 1940 या वर्षातली सरासरी काढून देशात मान्सून आगमनाची तारीख ठरवण्यात आली होती. आता 1961 ते 2019 या काळातली सरासरी काढून हवामान विभागानं मान्सून आगमनाचं नवं कॅलेंडर तयार केलं आहे.
राज्यातल्या प्रमुख शहरात मान्सून आगमनाची नवी तारीख कुठली?
शहर नवी तारीख जुनी तारीख
नागपूर 16 जून 9 जून
मुंबई 11 जून 10 जून
पुणे-बारामती 10 जून 8 जून
औरंगाबाद 13 जून 8 जून
अकोला- अमरावती 15 जून 8जून
मान्सून आगमनाच्या बदललेल्या कॅलेंडरनुसार महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आसाम, तेलंगाणा यासारख्या अनेक राज्यातही मान्सून आगमनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यासोबतच मान्सून परतीच्या प्रवासाच्या तारखाही लांबल्या आहेत. याबाबत नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी माहिती दिली.
(Monsoon new calendar)
संबंधित बातम्या