देशातील 10 कोटी रुपयांपेक्षा अधिकची कमाई करणाऱ्या धनिकांची संख्या वाढली, आकडा धक्कादायक

| Updated on: Sep 18, 2024 | 4:16 PM

भारतात करोडपती लोकांची संख्या वाढतच चालली आहे. देशातील दहा कोटी रुपये वार्षिक कमाई असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

देशातील 10 कोटी रुपयांपेक्षा अधिकची कमाई करणाऱ्या धनिकांची संख्या वाढली, आकडा धक्कादायक
Follow us on

भारतात श्रीमंताची संख्या वाढत चालली आहे.याचा अंदाज एका अहवालावरुन येऊ शकतो. सेंट्रम इन्स्‍टीट्यूशनल रिसर्चचा नवीन अहवाल आला आहे. या अहवालानूसार देशात 31,000 हून अधिक लोकांनी दहा कोटीची कमाई केली आहे. तर पाच कोटी कमविणाऱ्यांची संख्या 58,000च्या पार गेली आहे.हे आकडे हाय नेटवर्थवाल्या लोकांची जबरदस्त कमाई दाखवत आहेत.

पाच वर्षांत केली तगडी कमाई

सेंट्रम इन्स्टीट्यूशनल रिसर्च संस्थेच्या (Centrum Institutional Research) अहवालात साल 2019 पासून ते 2024 गेल्या पाच वर्षांचे आकडे जाहीर केले आहेत.या आकड्यांपासून भारतात करोडपती लोकांची संख्या वाढतच चालली आहे. या पाच वर्षात भारतात दहा कोटीहून जास्त कमाविणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्के वाढ झाली आहे. सध्या 31,800 करोडपती वार्षिक दहा कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.या काळात दहा कोटी हून अधिक कमाई करणाऱ्यांची एकूण संपत्ती 121 टक्क्यांनी वाढून 38 लाख कोटी रुपये झाली आहे.

अशा प्रकारे भारतीयांची वार्षिक कमाई पाच कोटीहून जास्त आहे. अशा लोकांच्या संख्येत 49 टक्के वाढ झाली आहे.अशा लोकांची संख्या 58,200 पर्यंत पोहचला आहे. साल 2019-24 या दरम्यान साल 2019-24 या पाच वर्षांत यांची एकूण संपत्तीत 106 टक्के उसळी आली आहे. आणि ती 40 लाख कोटी रुपये झाली आहे.

कोरोनाचा देखील प्रभाव पडला नाही

या काळात कोरोना सारखी साथ येऊनही भारतीय श्रीमंतांच्या संपत्ती वाढ झाली आहे.भारतात हाय नेटवर्थ वाल्यांची कमाई ( HNI ) 2028 पर्यंत वार्षिक सुमारे 14 टक्के वाढू शकणार असून ती 2.2 ट्रीलीयन डॉलरपर्यंत पोहचणार आहे.