पुणे : पुण्यात आज (26 ऑगस्ट) सिरम इनस्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संशोधित केलेल्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू झाला (Corona Vaccine Pune). भारती हॉस्पिटलमध्ये हा पहिला डोस दिला गेला.
पुण्यातील आज दोन स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे. लस देण्याआधी त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आता पुढील चार ते सहा महिने या दोघांचे निरीक्षण केले जाणार आहे. म्हणजेच लस परिमाणकारक आहे की नाही यासाठी अजून किमान सहा महिने तरी वाट पहावी लागणार आहे.
स्वतःवर मानवी चाचणी करून घेण्यासाठी पाच जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. मात्र, त्यापैकी तिघांमध्ये कोरोना अँटिबॉडीज सापडल्याने केवळ दोघांनाच आज ही लस देण्यात आली.
कोरोना विषाणूने जगभरासह देशात धुमाकूळ घातला आहे. रुग्णसंख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष कोरोना लसीवर लागून राहिले आहे. पुण्यात सिरम इनस्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून लस निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
नुकतेच सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाउंडेशनबरोबर महत्त्वपूर्ण करार झाला. या करारानुसार बिल गेट फाउंडेशन सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल 150 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार आहे. या माध्यमातून सिरम इन्स्टिट्यूट तब्बल 100 मिलियन डोस तयार करणार आहे.
भारताबरोबर मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये डोस दिले जाणार आहे. या लसीच्या एका डॉलरची किंमत ही तीन डॉलर असणार आहे. जगातील तब्बल 92 देशांमध्ये ही लस उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढविण्यात येईल. या माध्यमातून जास्तीत जास्त गरजवंतांना फायदा देण्याचा प्रयत्न आहे.
संबंधित बातम्या :