गांधीजी यांची ही पाच आंदोलनं ज्यामुळे देशाचं चित्रच बदललं…

| Updated on: Aug 14, 2024 | 4:51 PM

देश 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. लाल किल्ल्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशाला उद्देश्यून भाषण करतील. आपल्या स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांची आंदोलने उपयोगी पडली. त्याची महत्वाची पाच आंदोलने पाहूयात ज्याने देशाचे चित्र बदलले....

गांधीजी यांची ही पाच आंदोलनं ज्यामुळे देशाचं चित्रच बदललं...
Follow us on

भारतीयांना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सोडविण्यासाठी महात्मा गांधी यांचा अहिंसेचा मंत्र कामी आला. भारताचा  हा प्रवास सहज आणि सोपा नव्हता. दीडेशहून अधिक वर्षे ब्रिटीशांनी आपल्यावर राज्य केले. आपली सर्व साधनसामुग्री लंडनला नेली. ब्रिटीशांना हुसकावून लावण्यासाठी महात्मा गांधी यांच्या आंदोलनाचा मोठा फायदा झाला. महात्मा गांधी यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक आंदोलने केली. परंतू त्यातील पाच आंदोलनांनी देशाचे चित्र बदलले, आणि आपल्याला एका शिडशिडीत अगदीच किरकोळ अंगकाठीच्या महात्म्याने उपोषणाचे हत्यार वापरीत स्वातंत्र्य मिळवून दिले. ही आंदोलने कोणती ते पाहूयात…

असहकार चळवळ –

महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांच्या सरकारला कोणतेही सहकार्य न करण्याचा मंत्र जनतेला दिला ते असहकार आंदोलन म्हणजे या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात मोठे आंदोलन म्हटले जाते. साल 1920 मध्ये गांधीजी यांनी या आंदोलनात परदेशी कपड्यांची होळी करण्यास सांगितले. स्वदेशीचा मंत्र दिला.

मिठाचा सत्याग्रह –

मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधी यांच्या आंदोलनापैकी महत्वाचे आंदोलन आहे. गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातील साबरमती आश्रमात महात्मा गांधी आपल्या अनुयायांसह दांडी गावापर्यंत पदयात्रा काढली होती. 12 मार्च 1930 रोजी गांधीजी साबरमतीतून पायी निघाले आणि दांडीत जाऊन त्यांनी हाताच्या मुठीने मीठ उचलले.मिठावरील ब्रिटीशांनी लावलेल्या करामुळे हे आंदोलन झाले होते.

दलित आंदोलन –

महात्मा गांधींनी 8 मे 1933 रोजी अस्पृश्यांसाठी आंदोलन केले होते. स्पृश्य आणि अस्पृश्य हा भेद मिठावा आणि आपण सर्वजण हरिची म्हणजे ईश्वराची लेकरे आहोत असे ते म्हणाले.साल 1932 अखिल भारतीय अस्पृश्यता विरोधी लीगची स्थापना केली होती. त्यांनी दलितांसाठी हरिजन हा शब्द वापरण्यास सुरुवात केली होती.

भारत छोडो आंदोलन –

8 ऑगस्ट 1942 च्या सायंकाळी मुंबईतील काळबादेवी येथील गवॉंलिया टॅंक मैदानात जमलेल्या लाखोंच्या जनसमुदायासमोर महात्मा गांधी यांनी अंग्रेजो भारत छोडो असा नारा दिला. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळी धार आली.

चंपारण सत्याग्रह –

चंपारण सत्याग्रह हा भारतीयांनी इंग्रजांविरोधात सुरु केलेले पहिले सविनय कायदेभंग आंदोलन होते.बिहारच्या चंपारण जिल्ह्यात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाची सुरुवात 1917 मध्ये झाली. या आंदोलनातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध सर्वसामान्य जनतेला गांधीजी यांनी अहिंसक मार्गाने लढा कसा द्यायचा याची रुजवात केली.