त्या हल्लेखोरांनी ऑनलाईन अ‍ॅसिड मागविले होते, फ्लीपकार्ट आणि अॅमेझॉनला दिल्ली महिला आयोगाची नोटीस

| Updated on: Dec 15, 2022 | 6:59 PM

मुलीच्या वडीलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, या मुलीची प्रकृती आता स्थिर आहे. या मुलीचा चेहरा व गळा आठ टक्के भाजला आहे. या प्रकरणात सचिन अरोरा आणि त्याचे दोन मित्र हरषित अग्रवाल (19 ) आणि वीरेंद्र सिंग (22 ) यांना अटक करण्यात आली आहे.

त्या हल्लेखोरांनी ऑनलाईन अ‍ॅसिड मागविले होते, फ्लीपकार्ट आणि अॅमेझॉनला दिल्ली महिला आयोगाची नोटीस
acid
Image Credit source: acid
Follow us on

दिल्ली : दिल्लीच्या द्वारका परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीच्या चेहऱ्यावर बाईकवरुन आलेल्या दोघा तरूणांनी अ‍ॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला होता. या प्रकरणात अ‍ॅसिडची ऑनलाईन विक्री करणाऱ्या फ्लीपकार्ट आणि अॅमेझॉनला दिल्ली महिला आयोगाने नोटीस पाठवत स्पष्टीकरण मागितले आहे.

दिल्ली येथील द्वारका परिसरात एका 17 वर्षीय शाळकरी मुलीवर दिवसाढवळ्या अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला होता. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पीडित मुलगी रस्त्याच्या कडेने चालत असताना समोरुन एका दुचाकीवर दोनजण आले. त्यांनी या मुलीजवळ आल्यावर गाडीचा वेग कमी केला आणि त्याचवेळी मागे बसलेल्या व्यक्तीने या मुलीवर अ‍ॅसिड फेकल्याने ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

या प्रकरणी दिल्ली महिला आयोगाने कोणत्या सेलरने हे अॅसिड विकले, त्याची संपूर्ण माहिती मागवली आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अॅसिडची सहज उपलब्धता ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे,” असे आयोगाने दोन कंपन्यांना पाठवलेल्या नोटिसीत म्हटले आहे.

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रोडक्ट पोस्ट करण्याची परवानगी देण्यापूर्वी या कंपन्यांनी विक्रेत्याचा परवाना तपासला होता का आणि ज्यांनी ऑनलाइन ‘अॅसिड’ विकत घेतले त्यांचे फोटो आयडी घेतले होते का, असेही आयोगाने या नोटीसीत विचारले आहे. गव्हर्मंट रेग्युलेटेड प्रोडक्टच्या विक्रीबाबत प्लॅटफॉर्मद्वारे अवलंबण्यात येणारे धोरण, वेबसाइट्सवर ‘अॅसिड’ विक्रीस परवानगी देण्यास जबाबदार अधिकारी आणि त्यांच्यावर केलेल्या कारवाईचा तपशील देखील महिला आयोगाने मागितला
आहे.