सांगली : मिरज-पंढरपूर महामार्गा शेजारील 15 फूट चिखलात अडकलेल्या तीन गाई आणि एका वासराची तब्बल 16 तासाच्या बचावकार्यानंतर सुटका करण्यात आली (Cow in mud sangli) आहे. पाण्याच्या शोधात या गाई 15 फूट चिखलात अडकल्या होत्या. अॅनिमल राहतचे स्वयंसेवक आणि पोलिसांनी गाईंची सुखरुप सुटका (Cow in mud sangli) केली.
सांगली जिल्ह्यातील मिरज पंढरपूर महामार्गा लगतच्या शेताजवळील चिखलात या खिलाप गाई अडकल्या होत्या. कळंबी सिद्धेवाडीच्या हद्दीतील काकासाहेब पाटील यांच्या शेता जवळ ही घटना घडली होती.
काल (31 जानेवारी ) संध्याकाळी पाच वाजल्यापासून आज (1 फेब्रुवारी) सकाळी नऊ पर्यंत अथक प्रयत्न करून गावकऱ्यांना गाई चिखलातून काढण्यात यश आले. यामध्ये तीन मोठ्या गाई या पोटापर्यंत चिखलात रुतल्या होत्या. वजनदार गाई आणि बाहेर पडण्यासाठी चाललेली त्यांची केविलवाणी धडपड यामुळे गाई पुन्हा खोल रुतत होत्या. अखेर राहत अॅनिमल स्वयंसेवक संस्थेने गाईंना बाहेर काढले.
दरम्यान, या गाईंना बाहेर काढण्यासाठी राहत स्वयंसेवक संस्था आणि पोलिसांनी जेसीबी मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले. जेसीबी मशिनमुळे गाईंना बाहेर काढण्यास सोपे झाले.