बुलडाणा : एकीकडे संपूर्ण जग कोरोना विषाणूंशी लढा देत (Buldhana CRPF jawan martyred) आहे. तर दुसरीकडे सीमापलीकडे होणाऱ्या आतंकवादी कारवाई काही केल्या कमी होत नाहीत. जम्मू काश्मीरमधील सोपोर भागात झालेल्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले. यात बुलडाणा जिल्ह्यातील एका सुपुत्राचा समावेश आहे. तर या हल्ल्यात जैश ए मोहम्मदच्या दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे.
आज (18 एप्रिल) काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथील (Buldhana CRPF jawan martyred) नूरबाग परिसरात जम्मू काश्मीरमधील पोलीस आणि सीआरपीएफचे जवान गस्त घालत होते. त्यावेळी काही अतिरेक्यांनी अहदबाब चेकपोस्टजवळ पोलीस आणि जवनांना लक्ष्य केलं. यावेळी सीआरपीएफच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. यात हेड कॉन्स्टेबल राजीव शर्मा, कॉन्स्टेबल सी.बी. भाकरे, कॉन्स्टेबल सत्पाल परमार हे तिघे जवान शहीद झाले.
तर हेड कॉन्स्टेबल विश्वजीत घोष आणि गाडीचा चालक जावेद अहमद हे गंभीर जखमी झाले. यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्याचे सुपूत्र शहीद झाले आहे. चंद्रकांत भगवंतराव भाकरे (38) असे या शहीद जवानचे नाव आहे. ते बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील ते रहिवासी आहेत. ही बातमी कळताच संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली.
#Update The CPRF personnel who lost their lives in Sopore terrorist attack have been identified as 42-year-old Rajeev Sharma from Vaishali in Bihar, CB Bhakare (38) from Maharashtra’s Buldhan & Parmar Stayapal Singh (28) from Sabarkantha in Gujarat: CRPF https://t.co/MTTpwYMxyu
— ANI (@ANI) April 18, 2020
शहीद जवान भाकरे यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. चंद्रकांत भाकरे यांचे शिक्षण पदवी पर्यंत झाले आहे. 2005 मध्ये ते सीआरपीएफमध्ये भरती झाले.
गेल्या आठवड्याभरात भारतीय लष्करावर काश्मीरमध्ये झालेला हा तिसरा हल्ला आहे. दरम्यान सोपोरमध्ये जवानांवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा शोध सुरु (Buldhana CRPF jawan martyred) आहे.