पुणे-सातारा महामार्गावर दुचाकी-ट्रकचा अपघात, एकाच गावातील तीन तरुणांचा मृत्यू

| Updated on: Jul 23, 2019 | 12:29 PM

पुणे-सातारा महामार्गावरील शिवापूर फाट्याजवळ दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे, तर पाचजण जखमी झाले आहेत.

पुणे-सातारा महामार्गावर दुचाकी-ट्रकचा अपघात, एकाच गावातील तीन तरुणांचा मृत्यू
Follow us on

पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील शिवापूर फाट्याजवळ दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे, तर पाचजण जखमी झाले आहेत. सोमवारी (22 जुलै) रात्री 12.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आठ मित्र तळजाई टेकडीवर गेले होते. वाढदिवसाचा केक कापून हे मित्र शिवापूर येथील दर्ग्यात दर्शनासाठी निघाले होते. यादरम्यान तरुणांच्या दुचाकीला शिवापूर फाट्याजवळील कोंढणपूर येथे गॅसची वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले. या अपघातात अनिकेत रणदिवे, सुशील कांबळे, सुरेश शिंदे या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर करण जाधव, राकेश कुऱ्हाडे, अमर कांबळे, चेतन लोखंडे हे जखमी झाले आहेत.

जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. हे सर्व तरुण तळजाई परिसरात राहणारे असल्याची माहिती मिळत आहे. गावातील तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा परसली आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, कारच्या काचाही फोडल्या

पुणे अपघात : गर्दी पाहून थांबला, जवळ गेल्यावर समजलं, स्वत:चा भाऊच गेला!

रायगड बघायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, पुण्यातील 9 जणांचा जागीच मृत्यू

विसापूर किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान भरकटला, चार तास दगडाला लटकून राहिला