भंडारा : जंगलात एका अस्वला समोर दोन मित्र येतात आणि ते आपला जीव वाचवण्यासाठी एक शक्कल लढवतात ही गोष्ट तुम्हाला आठवत असेल? ज्यामध्ये दोन मित्रांपैकी एकजण आपला जीव वाचवण्यासाठी झाडावर चढतो तर दुसरा आपला श्वास रोखून जमीनीवर पडून मृत झाल्याचे (Tiger attack on man Bhandara) नाटक करतो. आता असाच काहीसा प्रसंग भंडाऱ्यातही पाहायला मिळाला आहे.
महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात सध्या वाघांची (Tiger attack on man Bhandara) दहशत आहे. नुकताच एक वाघ भंडारा जिल्ह्यातील गोडेखारी गावात शिरला. यावेळी वाघाने एका व्यक्तीवर हल्ला केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे यावेळी त्या व्यक्तीनेही मृत असल्याचे नाटक केले. यानंतर गावकऱ्यांनी आरडाओरडा करत वाघाला हुसकवण्याचा प्रयत्न केला. अखेर लोकांचा आवाज ऐकून वाघ थबकला आणि त्याने थेट जंगलाच्या दिशेने धुम ठोकली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
You want to see how does a narrow escape looks like in case of encounter with a #tiger. #Tiger was cornered by the crowd. But fortunately end was fine for both man and tiger. Sent by a senior. pic.twitter.com/1rLZyZJs3i
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) January 25, 2020
वाघ गावातील एका झाडाखाली शांत झोपला होता. यावेळी बाजूने काही लोक गावातून शेतात जात होते. हा आवाज ऐकून वाघ घाबरला. तसेच तो झाडातून बाहेर येत थेट जंगलाच्या दिशेने धावू लागला. यावेळी रस्त्यात त्याला एक व्यक्ती दिसला आणि त्याने त्याच्या अंगावर उडी घेत हल्ला केला. तसेच वाघाने त्या व्यक्तीला झोपवत त्याच्या छातीवर बसला होता. यानंतर सर्वजण ओरडून लागले. गोंधळ करु लागले त्यामुळे वाघ घाबरुन पळून गेला.
दरम्यान, याआधीही चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात वाघ आणि बिबट्याने पाळीव प्राणी तसेच माणसांवर हल्ले केले आहे. त्यामुळे सर्वजण येथे वाघाच्या दहशतीखाली राहतात.