न्यूयॉर्क : टाईम मॅगझीनने 2020 मधील सर्वात प्रभावी 100 व्यक्तींची यादी जाहीर केली (TIME 100 Most Influential People). या यादीत यावेळी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. मात्र, मोदींच्या नावाचा समावेश करताना टाईमने मोदींवर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचं भविष्य अंधकारमय केल्याचा गंभीर आरोपही केला आहे (Time Magazine criticize PM Narendra Modi).
पंतप्रधान मोदींचं नाव 100 प्रभावी व्यक्तींच्या यादीत समाविष्ट करताना टाईमने म्हटलं, “नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी भारतीय लोकशाही संशयास्पद केली आहे. भारताचे आतापर्यंतचे जवळपास सर्व पंतप्रधान देशातील बहुसंख्यांक 80 टक्के हिंदू समाजातून आले आहेत. मात्र, केवळ मोदींनीच इतरांनी कधीही चालवलं नाही असं सरकार चालवलं.”
“Though almost all of India’s Prime Ministers have come from the nearly 80% of the population that is Hindu, only @narendramodi has governed as if no one else matters,” @karl_vick writes #TIME100 https://t.co/N3fM2X4GHA
— TIME (@TIME) September 23, 2020
“नरेंद्र मोदी सर्वांच्या सशक्तीकरणाचं लोकप्रिय आश्वासन देत पहिल्यांदा निवडून आले. मात्र, त्यानंतर त्यांचा पक्ष भाजपने केवळ उच्च वर्गालाच नाकारलं नाही, तर मुस्लिमांना लक्ष्य करत विविधतेलाही नाकारलं. त्यांनी साथीच्या रोगाचं कारण सांगत विरोधीमत व्यक्त करणाऱ्यांना दडपलं आणि जगातील सर्वात जीवंत लोकशाही काळोखात गेली,” असंही टाईमने नमूद केलं आहे.
पंतप्रधान मोदींसोबत चीनचे राष्ट्रपती शी चिनपिंग, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत तैवानचे राष्ट्रपती त्सई इंग-वेन याचंही नाव आहे. या यादीत अनेक भारतीय किंवा भारतीय वंशाच्या नागरिकांचाही समावेश आहे. यात गूगलचे सीईओ सुंदर पिचाई, अभिनेता आयुष्मान खुराना, एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंद्र गुप्ता, अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्याही नावाचा समावेश आहे. इतकंच नाही तर भारतातील नागरिकत्व कायद्याला (एनआरसी-सीएए) विरोध करत शाहीन बाग प्रदर्शनात सहभागी झालेल्या बिल्किस बानो या आजींचाही सर्वात प्रभावी 100 व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
अमेरिकेतील प्रसिद्ध टाईम मॅगझीनने 2019 मध्ये देखील पंतप्रधान मोदींना या यादीत जागा दिली होती. टाईम मॅगझीनकडून अनेकदा मोदींवर वेगवेगळी मतं व्यक्त करण्यात आली आहेत. याआधी एकदा टाईमने आपल्या एका लेखात पंतप्रधान मोदींचा ‘डिव्हायडर इन चीफ’ असा उल्लेख केला होता. यानंतर मात्र दुसऱ्या लेखात मोदी सर्वांना जोडणारे दशकांनंतर मिळणारे नेते असल्याचं म्हटलं होतं.
संबंधित बातम्या :
मोदींच्या ‘डिव्हायडर इन चीफ’ उल्लेखाला सन्मान समजणाऱ्यांची सोशल मीडियावर फिरकी
TIME मासिकात मोदींचा ‘डिव्हायडर इन चीफ’ उल्लेख, आता मोदी म्हणतात….
आधी Divider in Chief आता Modi Has United India, ‘टाईम’ची कोलांटउडी!
संबंधित व्हिडीओ :
Time Magazine criticize PM Narendra Modi