[svt-event title=”अहमदनगरमधील पेट्रोल आणि डिझेल पंप खासगी वाहनासाठी बंद” date=”15/04/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेल पंप खाजगी वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिले. लॉकडाऊन कालावधी वाढवल्याने प्रशासनाने नवीन आदेश जारी केलेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही वाहनांना पेट्रोल आणि डिझेल दिले जाणार नाही. [/svt-event]
[svt-event title=”बारामतीत सातवा ‘कोरोना’ग्रस्त, न्यूमोनियाचं निदान झालेल्या रुग्णाचे रिपोर्ट ‘कोरोना’ पॉझिटिव्ह” date=”15/04/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ]
बारामतीत सातवा ‘कोरोना’ग्रस्त, न्यूमोनियाचं निदान झालेल्या रुग्णाचे रिपोर्ट ‘कोरोना’ पॉझिटिव्ह https://t.co/74WXM1AtJb #baramati #CoronaInMaharashtra #pune_carona
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 15, 2020
[svt-event title=”हँड सॅनिटायझरमध्ये 70 टक्के दारु, नागपुरात नशेसाठी हँड सॅनिटायझरचा वापर” date=”15/04/2020,9:59AM” class=”svt-cd-green” ]
हँड सॅनिटायझरमध्ये 70 टक्के दारु, नागपुरात नशेसाठी हँड सॅनिटायझरचा वापरhttps://t.co/VtiYcOObvt #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 15, 2020
[svt-event title=”पुण्यातील ‘ही’ पाच रुग्णालये कोरोनाबाधित रुग्णांसाठी निश्चित” date=”15/04/2020,9:58AM” class=”svt-cd-green” ]
पुण्यातील ‘ही’ पाच रुग्णालये कोरोनाबाधित रुग्णांसाठी निश्चितhttps://t.co/ZciuyboQbD
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 15, 2020
[svt-event title=”धक्कादायक! नागपुरात थेट मेडिकल स्टोअर्सधून दारुची विक्री” date=”15/04/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ]
धक्कादायक! नागपुरात थेट मेडिकल स्टोअर्सधून दारुची विक्रीhttps://t.co/LuId3TCjXY
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 15, 2020
[svt-event title=”वांद्रे स्टेशनबाहेर मजुरांची गर्दी जमवणारा अटकेत, नवी मुंबईत विनय दुबेला बेड्या” date=”15/04/2020,9:56AM” class=”svt-cd-green” ]
वांद्रे स्टेशनबाहेर मजुरांची गर्दी जमवणारा अटकेत, नवी मुंबईत विनय दुबेला बेड्या https://t.co/IizGmYev83 #Bandra #BandraStation #coronavirus #Lockdown2
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 15, 2020
[svt-event title=”नागपुरात एकाच कुटुंबातील तिघे कोरोनामुक्त, पक्षाघात झालेल्या पित्याचीही मात” date=”15/04/2020,9:55AM” class=”svt-cd-green” ]
नागपुरात एकाच कुटुंबातील तिघे कोरोनामुक्त, पक्षाघात झालेल्या पित्याचीही मातhttps://t.co/OIpPdx20V4 #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 15, 2020
[svt-event title=”सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजिस्टला ‘कोरोना’, पुण्यात 144 गर्भवती क्वारंटाईन” date=”15/04/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ]
सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजिस्टला ‘कोरोना’, पुण्यात 144 गर्भवती क्वारंटाईन https://t.co/7LLI0kPz4R
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 15, 2020
[svt-event title=”नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या तीन जणांना डिस्चार्ज ” date=”15/04/2020,9:43AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात कोरोना झालेल्या तीन जणांना काल (14 एप्रिल) रात्री डिस्चार्ज मिळाला आहे. आई, वडील आणि मुलानं कोरोनावर मात केली आहे. घरी आरती ओवाळून आई, वडील आणि मुलाचं स्वागत करण्यात आलं आहे. नागपुरात आतापर्यंत 11 जणांनी कोरोनावर मात केली. [/svt-event]
[svt-event title=”नाशिकमधील दूध व्यावसायिकांना मोठा दिलासा” date=”15/04/2020,9:37AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमधी दूध व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. दूध व्यावसायिकांना सकाळी 6 ते 7.30 आणि संध्याकाळी 4 ते 5.30 या वेळेत दूध विकण्याची परवानगी दिली आहे. अन्न धान्य आणि इतर अत्यावश्यक सेवेचे दुकानं बंद राहणार आहेत. [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात आजपासून भुसार मार्केट नियमितपणे सुरू” date=”15/04/2020,9:31AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात आजपासून भुसार मार्केट नियमितपणे सुरु करण्यात आलं आहे. दि पुणे मर्चंट चेंबर असोसिएशनच्या अनिश्चित बंदचा निर्णय मागे घेतल्यानं मार्केट पुन्हा सुरू करण्यात येत आहे. भुसार मार्केट सुरू करण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात 144 गरोदर महिला क्वारंटाईन ” date=”15/04/2020,9:24AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील शिक्रापूर परिसरामध्ये 144 गरदोर महिलांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. शिक्रापूर परिसरातील सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजीस्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या सर्व महिलांना क्वारंटाईन केलं आहे. 69 गरोदर महिलांनी कोरोना पॉझिटिव्ह रेडिओलॉजिस्ट कडून तपासणी केली होती तर 75 महिलांचा रेडिओलॉजिस्टसोबत थेट संपर्क आला नव्हता. [/svt-event]