LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज माध्यमांशी संवाद साधणार

| Updated on: May 25, 2019 | 4:16 PM

[svt-event title=”लोकसभेच्या निकालानंतर शिवसेनेला केंद्रात 5 मंत्री पद हवीत – सुत्रांची माहिती” date=”25/05/2019,3:51PM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेला 2 कॅबिनेट मंत्री आणि 3 राज्यमंत्री पद हवीत, कॅबिनेट मंत्रीपदासाठी संजय राऊत आणि अनिल देसाई यांचं नाव पुढे, तर राज्यमंत्री पदासाठी भावना गवळी, विनायक राऊत, अरविंद सावंत या शिवसेना नेत्यांची नाव आघाडीवर [/svt-event] [svt-event title=”माझा काँग्रेसमध्ये जाण्याचा काहीही संबंध […]

LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज माध्यमांशी संवाद साधणार
Follow us on

[svt-event title=”लोकसभेच्या निकालानंतर शिवसेनेला केंद्रात 5 मंत्री पद हवीत – सुत्रांची माहिती” date=”25/05/2019,3:51PM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेला 2 कॅबिनेट मंत्री आणि 3 राज्यमंत्री पद हवीत, कॅबिनेट मंत्रीपदासाठी संजय राऊत आणि अनिल देसाई यांचं नाव पुढे, तर राज्यमंत्री पदासाठी भावना गवळी, विनायक राऊत, अरविंद सावंत या शिवसेना नेत्यांची नाव आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”माझा काँग्रेसमध्ये जाण्याचा काहीही संबंध नाही, माझं कोणाशी बोलणं नाही – नारायण राणे” date=”25/05/2019,3:48PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी आज माध्यमांशी संवाद साधणार” date=”25/05/2019,3:43PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”एनडीएच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना” date=”25/05/2019,12:14PM” class=”svt-cd-green” ] एनडीएच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. उद्धव यांच्यासोबत आदित्य ठाकरेही एनडीएच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. खाजगी विमानाने उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”राहुल गांधींचा राजीनामा” date=”25/05/2019,12:09PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देण्याची शक्यता” date=”25/05/2019,11:06AM” class=”svt-cd-green” ] कांग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीची बैठक सुरु झाली आहे. राहुल गांधी आज आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बैठकीत UPA च्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी, नाना पटोले, मोतीलाल वोरा, के सी वेणुगोपाल, रजनी पाटील, गिरिजा व्यास, मुकुल वासनिक, पी सी चाको, अशोक गहलोत, अविनाश पांडे, गुलाम नबी आजाद, मल्लिकार्जुन खड़गे, कॅप्टन अमरिंदर सिंह हे बैठकीला पोहचले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”भाईंदरमध्ये 70 किलोहून अधिक अमली पदार्थांचा साठा जप्त” date=”25/05/2019,10:59AM” class=”svt-cd-green” ] भाईंदरमध्ये अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी अतुल कुलकर्णी यांचा टीमने ही कारवाई केली आहे. 70 किलोहून अधिक अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. बाजारामध्ये या अमली पदार्थाची किंमत तीन कोटी रुपये इतकी आहे. यावेळी चार आरोपींना अटक करण्यात आली असून एक गाडीही जप्त करण्यात आली आहे. आरोपी मध्यप्रदेशहून अमली पदार्थ विकण्यासाठी आले होते. रात्री भाईंदर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. [/svt-event]

[svt-event title=”अकोल्यात दोघांवर प्राणघातक हल्ला, हल्ल्यात एकाचा मृत्यू” date=”25/05/2019,8:53AM” class=”svt-cd-green” ] अकोला जिल्हातल्या अकोट तालुक्यातील मोहाळ्यात रात्रीच्या सुमारास दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकजण गंभीर जखमी आहे. मतीन पटेल असं मृत व्यक्तिचे नाव आहे. मृत व्यक्ती भाजपाचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता असून एसआरपीएफची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=” बोट उलटून तीन जणांचा मृत्यू” date=”25/05/2019,8:22AM” class=”svt-cd-green” ] पुणे : जुन्नर येथे माणिकडोह धरणात मासेमारीसाठी गेलेल्या तरुणांची बोट उलटून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गणेश साबळे, स्वप्निल साबळे आणि पंढरीनाथ मुंढे, असं मृत व्यक्तिंची नावे आहेत. [/svt-event]

[svt-event title=”नंदूरबार येथे भीषण अपघात, 10 प्रवाशी गंभीर जखमी” date=”25/05/2019,8:02AM” class=”svt-cd-green” ] मालेगावहून हजीरा गुजरात येथे जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना पहाटे 4 च्या सुमारास घडली. सुरत-नागपूर महामार्गावर घोडजमाणे येथे हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर आदळ्याने हा अघात झाला. अपघातात 10 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे सर्व प्रवाशी मालेगाव येथील रहिवाशी आहेत. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीमध्ये खासगी बसचा अपघात, 20 प्रवाशी जखमी” date=”25/05/2019,7:55AM” class=”svt-cd-green” ] संगमेश्वर येथे खासगी बसचा अपघात झाला आहे. स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे बस पलटी झाली. संगमेश्वर बस स्थानक पुलाजवळ हा अपघात घडला. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी सुमारे 20 जण जखमी असून त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला होता [/svt-event]