[svt-event title=”सचिन सावंत यांना काँग्रेसकडून उमेदवारी जवळपास निश्चित” date=”29/10/2020,3:50PM” class=”svt-cd-green” ] सचिन सावंत यांना काँग्रेसकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेची उमेदवारी निश्चित, पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब [/svt-event]
[svt-event title=”50% शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश” date=”29/10/2020,3:22PM” class=”svt-cd-green” ] शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था मधील ऑनलाइन,ऑफलाईन आणि दूरस्थ शिक्षणासाठी राज्य सरकारची मान्यता, त्यासाठी 50% शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश, शासकीय, खासगी, अनुदानित विनाअनुदानित सर्व शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिकेतर कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू व्हावं लागणार, 50% क्षमतेने उपस्थिती, राज्य सरकारचा निर्णय [/svt-event]
[svt-event title=”मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात” date=”29/10/2020,1:14PM” class=”svt-cd-green” ] राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावाबाबत चर्चेची शक्यता [/svt-event]
[svt-event title=”मुख्यमंत्र्यांची कांदा व्यापाऱ्यांसोबत बैठक” date=”29/10/2020,1:12PM” class=”svt-cd-green” ] कांदा अघोषित खरेदी बंद विषय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, दुपारी 2 वाजता मुंबईत बैठक, कृषिमंत्री दादा भुसे यासह व्यापारी या बैठकीत, कांदा लिलाव पुन्हा सुरू करण्यासाठी, राज्याची भूमिका आज होणार निश्चित, केंद्र सरकारकडे, राज्य करकारनं, स्टॉक लिमिट रद्द करा ही मागणी करावी, व्यापारी या मागणीवर ठाम [/svt-event]
[svt-event title=”वाढीव वीजबिलासंदर्भात राज्यपालांशी चर्चा, वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांनाही भेटेन : राज ठाकरे” date=”29/10/2020,11:45AM” class=”svt-cd-green” ] मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वीजबिलाच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. लॉकडाऊनमध्ये लोकांना रोजगार नाही, पैसा नाही तरीही लोकांची वीजबिलं चार-पाच पट आली आहेत, त्या बिलांच्या कपातीबाबत निर्णय व्हावा अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली. [/svt-event]
[svt-event title=”मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण” date=”29/10/2020,9:17AM” class=”svt-cd-green” ] मराठवाड्यात तब्बल 35 लाख 69 हजार 400 शेतकऱ्यांचे नुकसान, 24 लाख 95 हजार 901 हेक्टरवर अतोनात नुकसान, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2546 कोटी रुपयांची गरज, औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाने बनवला अहवाल, पंचनामे पूर्ण करून मदत अहवाल सादर झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा [/svt-event]
[svt-event title=”मुंबईतील बेस्टसाठी सेवा बजावण्यासाठी गेलेल्या सोलापूरच्या 81 कर्मचाऱ्यांना कोरोना” date=”29/10/2020,9:14AM” class=”svt-cd-green” ] मुंबईची लोकल सर्वासामान्य प्रवाशांसाठी बंद असल्यामुळे बेस्टसाठी सोलापूर विभागातील कर्मचारी पाठवण्यात आले होते. त्यातील 81 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. [/svt-event]
[svt-event title=”नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या लाखाच्या उंबरठ्यावर, खबरदारीमुळे 1300 गावं कोरोनापासून सुरक्षित” date=”29/10/2020,8:25AM” class=”svt-cd-green” ] नागपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या लाखाच्या उंबरठ्यावर, रुग्णसंख्या वाढली तरिही 1300 गावांनी वेशीवर रोखला कोरोना, जिल्ह्यातील १८६७ पैकी १३०० गावांमध्ये कोरोनाचा एकंही रुग्ण नाही. जिल्ह्यातील बऱ्याच गावांनी सीमा सील केल्या होत्या. खबरदारी घेतल्यामुळे १३०० गावं कोरोनापासून सुरक्षित, [/svt-event]
[svt-event title=”बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या अपहरणाचा संशय” date=”29/10/2020,8:20AM” class=”svt-cd-green” ] बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकरांच्या अपहरणाचा संशय, मुलगा कपिल याच्याकडून अपहरणाचा संशय,यामागे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप, संबंधित राजकीय व्यक्तीची माहिती पुणे पोलिसाना देण्यात आली आहे. कपिल पाषाणकर यांनी काल पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. 8 दिवसांनंतरही गौतम पाषाणकर बेपत्ता, आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता [/svt-event]
[svt-event title=”जालना शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली” date=”29/10/2020,8:17AM” class=”svt-cd-green” ] जालना शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळची घटना, पाण्याच्या जोरदार फवाऱ्यांमुळे पैठण पाचोड रस्ता बंद, पाईपलाईन फुटल्यामुळे जालना शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद. जायकवाडी धरणातून होतोय जालना शहराला पाणीपुरवठा [/svt-event]
[svt-event title=”नागपूर शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर” date=”29/10/2020,8:15AM” class=”svt-cd-green” ] नागपूर शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर, नागपूर सहसंपर्क प्रमुखपदी शेखर सावरबांधे आणि सतिश हरडेंची नियुक्ती, व्यावसायिक प्रमोद मानमोडेंची प्रभारी महानगरप्रमुख म्हणून वर्णी, महानगर संघटक म्हणून मंगेश काशीकर यांची निवड, नितीन तिवारी, दिपक कापसे नागपूर शहरप्रमूख, माजी खासदार प्रकाश जाधव यांना डावललं, उपमहानगर प्रमुख म्हणून बंडू तळवळकर, गूड्डू रहांगडाले, आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नियुक्त्या जाहीर. [/svt-event]
[svt-event title=”नागपुरातील युवतीवर उत्तर प्रदेशात अतिप्रसंग” date=”29/10/2020,8:09AM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील युवतीवर उत्तर प्रदेशात अतिप्रसंग, वृंदावनमध्ये महंत दिनबंदू दासविरोधात नागपुरात तक्रार, नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल, आचार्य पदवीच्या शिक्षणासाठी गेली असता केला अतिप्रसंग, तरुणी कथा वाचनासाठी देशभर भ्रमंती करत असते. महंत दिनबंदू दासशी सोशल मीडियावरुन ओळख झाली होती. वृंदावनवरुन परत असल्यावर नागपूरात केली पोलीस तक्रार [/svt-event]
[svt-event title=”केंद्रीय मंत्री मनेका गांधींच्या फोननंतर नागपूरमधील मंदिरातला बोकडबळी रोखला” date=”29/10/2020,7:57AM” class=”svt-cd-green” ] नागपूर जिल्ह्यातील कामठीतील मॉ दुर्गा सप्तशती मंदिरात बळी देण्यासाठी तीन बोकड आणले होते. प्राणीप्रेमी करीश्मा गिलानी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. एका बोकडाचा बळी दिला, दोन बोकडांचा बळी पोलिसांनी रोखला. [/svt-event]
[svt-event title=”खासदार बंडू जाधव धमकीप्रकरणी एक जण ताब्यात” date=”29/10/2020,7:51AM” class=”svt-cd-green” ] खासदार बंडू जाधव धमकीप्रकरणी नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. हा तरुण मूळचा अमरावतीचा असून सागर वाघमारे असे त्याचे नाव आहे. याबाबत अधिक चौकशी सुरु आहे. [/svt-event]
[svt-event title=”नागपूर शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर” date=”29/10/2020,7:36AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : सहसंपर्क प्रमुखपदी शेखर सावरबांधे आणि सतिश हरडेंची नियुक्ती, व्यावसायिक प्रमोद मानमोडेंची प्रभारी महानगरप्रमुख म्हणून वर्णी, महानगर संघटक म्हणून मंगेश काशीकर यांची निवड, नितीन तिवारी, दिपक कापसे नागपूर शहर प्रमुख, माजी खासदार प्रकाश जाधव यांना डावललं, उपमहानगर प्रमुख म्हणून बंडू तळवळकर, गूड्डू रहांगडाले [/svt-event]
[svt-event title=”‘मराठी भाषिकांची मनापासून माफी मागतो’, मनसे-शिवसेनेच्या दणक्यानंतर जान कुमार सानूची माफी” date=”29/10/2020,7:02AM” class=”svt-cd-green” ] ‘कलर्स’ वाहिनीच्या ‘बिग बॉस’ (Bigg Boss 14) या रियालिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू या स्पर्धकाने मराठी भाषेची चीड येत असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन मनसे आणि शिवसेना आक्रमक झाल्यानंतर VICOM 18 पाठोपाठ आता जान कुमार सानू यानेदेखील माफी मागितली आहे. “माझ्याकडून नकळत एक चूक झाली, ज्यामुळे मराठी भाषिकांना आणि त्यांच्या अस्मितेला ठेच पोहोचली आहे. मी मराठी लोकांची मनापासून माफी मागतो. मराठी भाषिकांना वाईट वाटावं, असा माझा हेतू नव्हता. माझ्यामुळे बिग बॉसलाही शरमेने मान खाली घालावी लागली. त्यामुळे बिग बॉसचीही माफी मागतो. अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही, याची मी काळजी घेईन”, अशा शब्दात जान याने माफी मागितली. [/svt-event]
संबंधित बातम्या
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपालांना भेटणार, भेटीचा विषय मात्र अद्याप अस्पष्ट
राज ठाकरे मैदानात, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या भेटीची वेळ ठरली