मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1982 वर पोहचली आहे. आज (12 एप्रिल) कोरोनाच्या 221 नवीन रुग्णांची नोंद झाली (Total Corona Patient in Maharashtra). आतापर्यंत उपचारानंतर 217 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात 1616 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्रात आजपर्यंत 41 हजार 109 नमुन्यांपैकी 37 हजार 964 जणांच्या कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्या आहेत, तर 1982 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 61 हजार 247 व्यक्ती घरगुती विलगीकरणात आणि 5064 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. यातील 755 रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे. राज्यात या व्यक्तींपैकी 37 जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये 8, यवतमाळ येथे 7, बुलढाणा जिल्ह्यात 6 , मुंबईत 3 तर पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील प्रत्येकी 2 जण आहेत. तसेच रत्नागिरी, नागपूर मनपा, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीममधील प्रत्येकी एकाला कोरोना संसर्ग झाला आहे. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील 6 जण अहमदनगर येथे, तर 1 जण पिंपरी चिंचवड येथे कोरोना बाधित आढळले आहेत.
आज राज्यात 22 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे 16, पुणे येथील 3 तर नवी मुंबईचे 2 आणि सोलापूरचा 1 रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 13 पुरुष तर 9 महिला आहेत. मृतांपैकी 6 जणाचं वय 60 वर्षांवरील आहेत. 15 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील, एकजण 40 वर्षांपेक्षा लहान आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 22 पैकी 20 रुग्णांमध्ये ( 91 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी एकाला मलेरिया देखील होता. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 149 झाली आहे.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण 4846 सर्वेक्षण पथके काम करत आहेत. त्यांनी 17.46 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एकाच घरातील त्यांच्या सहवासातील 26 जण कोरोना बाधित आढळले होते. यातील 24 जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. इस्लामपूरातील या भागात 31 सर्वेक्षण पथकांनी मागील 2 आठवडे साडेसात हजाराहून अधिक लोकसंख्येचे नियमित सर्वेक्षण केले आहे.
कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी :
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
संबंधित बातम्या :
कोरोनाचा कहर, देशात 24 तासात 909 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 8,356 वर
दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, शिक्षण विभागाचा एसएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
भारतात ‘कोरोना’ग्रस्त तुलनेने कमी, मात्र फैलाव दर वाढता, ‘कोरोना’ कसा पसरतोय?
‘जी दक्षिण’मध्ये अडीचशे कोरोनाग्रस्त, मुंबईची वॉर्डनिहाय ‘कोरोना’ रुग्णसंख्या
Total Corona Patient in Maharashtra Latest Update