राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 5218, कोठे किती रुग्ण?

| Updated on: Apr 21, 2020 | 9:34 PM

राज्यात आज (21 एप्रिल) 552 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 5218 झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra ).

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 5218, कोठे किती रुग्ण?
Follow us on

मुंबई : राज्यात आज (21 एप्रिल) 552 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 5218 झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra ). विशेष म्हणजे आज दिवसभरात राज्यात 150 रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. यासह राज्यभरात आतापर्यंत 722 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 4245 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 83 हजार 111 कोरोना चाचणी झाल्या. यापैकी 77 हजार 638 जणांची चाचणी निगेटिव्ह आली, तर 5218 जण पॉझिटिव्ह आली आहे. सध्या राज्यात 99 हजार 569 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच 7,808 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात 19 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 251 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये मुंबई येथील 12, पुण्यातील 3, ठाणे मनपा क्षेत्रातील 2 तर सांगली येथील 1 आणि पिंपरी चिंचवड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 10 पुरुष तर 9 महिला आहेत. त्यात 60 वर्षे किंवा त्यावरील 9 रुग्ण आहेत तर 9 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. एक रुग्ण 40 वर्षांखालील आहे. या 19 मृत्यूंपैकी 12 रुग्णांमध्ये (63 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.


राज्यात रुग्णांचे क्लस्टर सापडलेल्या भागात क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 432 कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण 6611 सर्वेक्षण पथकांनी काम केले. यात त्यांनी 26.89 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

टीप : या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्त्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा/मनपांनी उपलब्ध करुन दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत. आज मुंबई मनपा क्षेत्रात प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या 17 एप्रिलपासूनच्या अहवालातील रुग्णांचा समावेश करण्यात आलेला आहे.

संबंधित बातम्या :

वर्ध्यात जिल्हा प्रशासनाचा पुढाकार, निवारा गृहातील 6800 विस्थापित मजुरांच्या हाताला काम

Kasturba Hospital | कस्तुरबा रुग्णालयाचं शतक, शंभरावा रुग्ण बरा करुन घरी पाठवला

लॉकडाऊनदरम्यान Whatsapp कडून युझर्ससाठी नवं फीचर लाँच

आधी ‘मातोश्री’जवळचा चहावाला, आता ‘वर्षा’वरील महिला पोलीस कोरोना पॉझिटिव्ह!

Total Corona Patient in Maharashtra