Corona : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 6817 वर, कोठे किती रुग्ण?

| Updated on: Apr 24, 2020 | 9:38 PM

महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 817 वर पोहचली आहे. आज (24 एप्रिल) दिवसभरात एकूण 394 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra).

Corona : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 6817 वर, कोठे किती रुग्ण?
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 817 वर पोहचली आहे. आज (24 एप्रिल) दिवसभरात एकूण 394 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra). आज 117 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत राज्यभरात 957 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 5 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत महाराष्ट्रात 1 लाख 2 हजार 189 कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी 94 हजार 485 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले, तर 6 हजार 817 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात एकूण 1 लाख 19 हजार 161 लोक होम क्वारंटाईनमध्ये तर 8 हजार 814 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात 18 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 301 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील 11, पुणे येथील 5 तर मालेगाव येथील 2 जणांचा समावेश आहे. या मृत्यूंपैकी 12 पुरुष तर 6 महिला आहेत. आज झालेल्या 18 मृत्यूपैकी 9 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील वयाचे आहेत, तर 6 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 3 रुग्ण 40 वर्षांखालील आहेत. या 18 मृत्यूंपैकी 12 रुग्णांमध्ये ( 67 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

सध्या राज्यातील कोरोना आजाराचा मृत्यूदर हा 4.4 टक्के आहे. राज्यातील 269 मृत्यूंचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता 50 वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर हा कमी आढळून येतो. विशेषतः 21 ते 30 वर्षे वयोगटात मृत्यूदर 0.64 टक्के इतका आहे. त्यापुढील वयोगटात मृत्यूदर वाढताना दिसून येतो. 61 ते 70 या वयोगटात मृत्यूदर सर्वाधिक म्हणजे 17.78 टक्के एवढा आहे. यामुळे 50 वर्षांवरील आणि इतर अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोना आजारांमुळे गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असल्याचं दिसत आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 512 कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण 7 हजार 702 सर्वेक्षण पथकांनी 28.88 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

(टीप : या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा/मनपांनी उपलब्ध करुन दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत. बुलढाणा आणि जालना येथील एकूण 4 रुग्णांची झालेली दुहेरी नोंद आज दुरुस्त करण्यात आली आहे.)

संबंधित बातम्या :

Nitin Gadkari Exclusive | मुख्यमंत्र्यांनी सांगावं, मी नागपुरात बसल्या बसल्या लाख-दीड लाख PPE किट पाठवतो : गडकरी

बुलेट ट्रेन रोखा, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखणं अमानवीय : राहुल गांधी

वाशिम जिल्हा कोरोनामुक्त, एकमेव कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह

Marathwada Corona Update | लढवय्या मराठवाडा कोरोनाचा मुकाबला कसा करतोय?

Pune Corona | 74 हॉस्टेल्स, 300 शाळा सज्ज, पुण्यात कोरोना लढ्यासाठी प्रशासनाची काय काय तयारी?

Total Corona Patient in Maharashtra Latest Update