मुंबई : राज्यात आज (4 एप्रिल) 145 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 635 वर पोहचली आहे. आतापर्यंत 52 कोरोना बाधित रुग्णांना उपचार घेऊन बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली (Total Corona Patient in Maharashtra). आजच्या राज्यस्तरीय अहवालात खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना अहवालांचा समावेश करण्यात आला आहे.
आज दिवसभरात राज्यात एकूण 6 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या मृत्यूपैकी 1 रुग्ण मुंब्रा (ठाणे) येथील, 1 रुग्ण अमरावती येथील आणि उर्वरित 4 रुग्ण मुंबई येथील आहेत.
राज्यात कोरोना बाधित १४५ नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या ६३५ झाली आहे. आतापर्यंत ५२ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 4, 2020
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय कोरोना बाधित रुग्णांचा तपशील :
राज्यात आज एकूण 708 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 14 हजार 503 नमुन्यांपैकी 13 हजार 717 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना चाचणीत निगेटिव्ह आले आहेत, तर 635 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 42 हजार 713 व्यक्ती घरगुती विलगीकरणात आहेत. 2913 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त 1225 व्यक्तींच्या यादीपैकी 1033 व्यक्तींशी संपर्क झाला आहे. त्यापैकी 738 जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी 7 जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत, तर एक जण हिंगोलीतील आहे.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी 523 टीम काम करत आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्रात 423 टीम कार्यरत आहेत. नागपूर मनपामध्ये 210 टीम घरोघर सर्वेक्षणाचे काम करत आहेत. नवी मुंबई मनपा क्षेत्रात 196 टीम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. राज्यात या प्रकारे एकूण 2849 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 10 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.
आजच्या मृत्यू झालेल्या 6 रुग्णांचे तपशील –
कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 32 झाली आहे.
संबंधित बातम्या :
पुण्यात 54 जणांना कोरोनांचा संसर्ग, मरकजमध्ये सहभागी झालेल्यांची शोधाशोध सुरुच
तब्बल 1023 तब्लिगींना कोरोना, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर
स्वत:ची काळजी घ्या, सरकार तुमच्या पाठीशी, अनिल देशमुखांचं पोलिसांना आवाहन
‘धनंजय मुंडे कळवा, हजार रुपये मिळवा’, सुरेश धस यांची घोषणा
पुण्यात मोकाट फिरणाऱ्यांना अद्दल, 5,930 वाहनं जप्त, तर 2,727 जणांवर गुन्हा दाखल
Total Corona Patient in Maharashtra