पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोच आहे. या संसर्गाच्या केंद्रभागी मुंबईनंतर पुण्याचा क्रमांक येतो. पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येसोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे (Total Corona Patient in Pune). रविवारी (26 एप्रिल) जिल्ह्यात 80 नवीन रुग्णांची वाढ झाली. यासह पुण्यातील एकूण रुग्णांचा आकडा तब्बल 1 हजार 264 वर पोहचला आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात दिवसभरात 5 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील मृतांचा आकडा 77 वर पोहचला आहे.
मृतांमध्ये गणेश नगरमधील एका 51 वर्षीय पुरुष रुग्णाचा, गणेश पेठेतील 77 वर्षे पुरुषाचा, सय्यद नगर (हडपसर) येथील 66 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त पाटील इस्टेट परिसरातील 65 वर्षीय पुरुष आणि कोंढव्यातील 40 वर्षीय पुरुष या रुग्णांचा देखील मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त 44 कोरोना रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर पुण्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या पुण्यात ॲक्टिव कोरोना रुग्णांची संख्या 902 इतकी आहे. यापैकी 367 रुग्ण नायडू रुग्णालयात, 28 ससूनमध्ये आणि उर्वरित रुग्णांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
एकिकडे कोरोना बाधितांची आणि मृतांची संख्या वाढत असताना काहीसा दिलासाही मिळत आहे. आज दिवसभरात पुण्यात 6 जणांना उपचारानंतर बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या आता 165 झाली आहे.
बेशिस्त पुणेकरांवर पोलिसांची कारवाई
पुण्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांनी बाराशेचा टप्पा ओलांडला आहे. तर मृतांच्या आकड्यांनी पाऊन शतक केव्हाच पार केलंय. मात्र कोरोनाचा उद्रेक वाढण्यामागं पुणेकरांची बेफिकिरी कारणीभूत आहे. त्यामुळेच पुणे पोलिसांनी देखील या बेफिकिर पुणेकरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे पोलिसांनी लॉकडाऊन काळात तब्बल 82 हजार 631 कारवाया केल्या आहेत. साधारण महिन्याभरातील या सर्व कारवाया आहेत. या कारवायांवरुन पुणेकरांचा बेशिस्तपणा स्पष्टपणे समोर येतो आहे.
कलम 188 अंतर्गत तब्बल 13 हजार 50 गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर 33 हजार 361 वाहने जप्त करण्यात आली. त्याचबरोबर 34 हजार 743 नोटिसा बजावल्या आहेत. मॉर्निंग वॉक करणाऱ्या 778 आणि मास्क न वापरणाऱ्या 699 नागरिकांवरही कारवाई झाली आहे. अजूनही कारवाई सुरू असून कारवाईचा आकडा लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात आता 1646 एसपीओ नियुक्त करण्यात आले आहेत.
पुण्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. मात्र काही पुणेकर किरकोळ कारणास्तव नियमांचा भंग करुन मोकाट फिरताना दिसतात. त्यामुळे प्रशासन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र अशा मोकाट फिरणाऱ्यांमुळे कोरोना नियंत्रणाच्या कामात बाधा येत असल्याचं दिसत आहे.
कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी :
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
संबंधित बातम्या :
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 8 हजार 68, कोठे किती रुग्ण?
महाराष्ट्राला काहीसा दिलासा, 11 जिल्ह्यांमध्ये मागील 3 दिवसात एकही रुग्ण नाही
‘कोरोना’शी झुंजताना प्राण गमावलेल्या दोन्ही पोलिसांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची मदत
धारावीसाठी बीएमसीचा अॅक्शन प्लॅन, 350 खासगी दवाखाने सोमवारपासून सुरु होणार
Total Corona Patient in Pune