मुंबई : देशात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला (Transgender community mumbai) आहे. या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक समाग्री सोडली तर सर्व काही बंद आहे. त्यामुळे याचा फटका हात मजूर आणि तृतीयपंथी समाजाला (Transgender community mumbai) बसत आहे.
लॉकडाऊन असल्यामुळे काम धंदे बंद आहेत. लोकांना काम नाही. तृतीयपंथी समाजाच्या उपजीविकेचे प्रमुख माध्यम नृत्य करणे, बधाई मागणे किंवा भीक मागणे. पण सध्या त्यांच्यासमोर कुठलाही पर्याय नाही. कारण सर्व ठिकाणी बंदी आहे. त्यामुळे या समाजाच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सर्वकाही बंद असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. तृतीयपंथी समाजाला सरकारकडून मास्क, सॅनेटायझर आणि चांगल्या स्वास्थ्य सेवा उपलब्ध करुणे देणे हे अत्यंत गरजेचे आहे. तसेच आमच्या इतर समस्या सरकारने पूर्ण कराव्यात अशी मागणी तृतीयपंथी समाजाकडून केली जात आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत. सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 160 झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे.