Corona : पुण्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘त्रिसूत्री’ निश्चित!

| Updated on: Apr 19, 2020 | 9:27 AM

सरकारचे प्रमुख तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी ही त्रिसूत्री तयार केली आहे. कोरोनसंदर्भात झालेल्या बैठकीत ही त्रिसूत्री ठरवण्यात आली.

Corona : पुण्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी त्रिसूत्री निश्चित!
Follow us on

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल पुण्यात आढावा (Trisutri to Stop Corona Deaths) बैठक घेतली. यादरम्यान, त्यांनी पुण्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. त्यानुसार, पुण्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी एक त्रिसूत्री निश्चित करण्यात (Trisutri to Stop Corona Deaths) आली आहे.

पुण्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी त्रिसूत्री निश्चित करण्यात आली आहे –

  • लवकर निदान करणे
  • लक्षणे नसणाऱ्यांवर उपचार
  • रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे

अशी त्रिसूत्री निश्चित करण्यात आली आहे.

सरकारचे प्रमुख तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी ही त्रिसूत्री तयार केली आहे. कोरोनसंदर्भात झालेल्या बैठकीत ही त्रिसूत्री ठरवण्यात आली. या त्रिसूत्रीच्या आधारे पुण्यातील मृत्यूदर कमी करण्याचे नियोजन आहे.

पुण्यातील मृत्युदराचे प्रमाण जगाच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. तो मृत्युदर कमी करण्याचं मोठं आव्हान आरोग्य विभागापुढे आहे. डॉ. सुभाष साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ही त्रिसूत्री ठरवण्यात अली. या बैठकीला बी. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय तावरे (Trisutri to Stop Corona Deaths) उपस्थित होते.

देशात सर्वाधिक मृत्यूदर पुण्यात

पुण्यात कोरोना रुग्णांबरोबर मृतांची संख्या ही राज्याच्या तुलनेत अधिक वाढत आहे. 100 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यातील मृतांचा आकडा पाहिला तर देशात सर्वाधिक मृत्यूदर पुणे जिल्ह्याचा असल्याचे दिसते. मुंबईत मृतांची संख्या सर्वाधिक असली तरी रुग्णांची संख्या अधिक असल्याने मृत्यूदर हा सहा टक्क्याच्या जवळपास आहे

पुण्याचा मृत्यूदर हा 11. 96% असून त्या तुलनेने जगाचा मृत्यूदर 5.97 टक्के आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढण्याबरोबरच मृतांचा आकडा वेगानं वाढत आहे. राज्यात सर्वाधिक 126 मृत्यू मुंबई, तर 50 मृत्यू पुणे जिल्ह्यात झाले आहेत.

‘हवं ते घ्या, मात्र पुण्यातील मृत्यूदर कमी करा’, अजित पवार

पुण्यातील कोरोना मृत्यूदर हा इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. पुण्यातील मृत्यूदर पाहता आता शासनानेही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील मृत्यूदर कमी करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिका आणि रुग्णालयांना केल्या आहेत. “तुम्हाला काय हवं ते घ्या, मात्र पुण्यातील मृत्यूदर कमी झाला पाहिजे“, अशा सूचना अजित पवार यांनी केल्या आहेत.

536 कोरोनाबाधित रुग्णांची वार्डनिहाय आकडेवारी

1. येरवडा धानोरी – 52
2. नगर रोड वाघोली – 6
3. वानवडी रामटेकडी – 32
4. हडपसर मुंडवा – 23
5. पुण्याबाहेर – 27
6. कोंढवा येवलेवाडी – 5
7. बिबवेवाडी – 23
8. भवानी पेठ – 140
9. ढोले पाटील – 70
10. कसबा विश्रामबागवाडा – 65
11. शिवाजीनगर घोले रोड – 39
12. औंध बाणेर – 3
13. कोथरुड बावधन – 1
14. वारजे कर्वेनगर – 9
15. सिंहगड रोड – 9
16. धनकवडी सहकारनगर – 32

पुण्यात कुठे किती मृत्यू?

1. येरवडा धानोरी – 3
2. वानवडी रामटेकडी – 5
3. हडपसर मुंडवा – 3
4. आऊटसाईड पुणे – 2
5. कोंढवा येवलेवाडी – 1
6. बिबवेवाडी – 2
7. भवानी पेठ – 16
8. ढोले पाटील – 3
9. कसबा विश्रामबाग वाडा – 5
10. शिवाजीनगर भोले रोड – 4
11. औंध बाणेर – 1
12. वारजे कर्वेनगर 1
13. धनकवडी सहकार नगर – 2

Trisutri to Stop Corona Deaths

संबंधित बातम्या :

धारावीत कोरोना रुग्णांची शंभरी पार, माटुंगा लेबर कॅम्पमधील चौघांना लागण

Corona Update : यवतमाळला मोठा दिलासा, कोरोनाबाधित 10 पैकी 4 रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह

Corona : जळगावात कोरोनाचा तिसरा रुग्ण; 60 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण

मुंबईत एका दिवसात 184 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?