उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी साडे तीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या (Tuljabhavani Devi Navratri Utsav) आई तुळजाभवानी मातेचा नवरात्र उत्सव उद्या (17 ऑक्टोबर) दुपारी घटस्थापनाने होईल. तुळजाभवानी मंदिर प्रशासन आणि पोलीस विभागाने पूर्ण तयारीसह सज्ज झाले आहे (Tuljabhavani Devi Navratri Utsav).
यंदाचा नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने भक्तांच्या उपस्थितीविना साजरा होणार असून देवीचे सर्व पूजा धार्मिक विधी आणि कुलाचार केले जाणार आहेत. तुळजाभवानी मंदिर नवरात्र काळात पूर्णपणे बंद असल्याने पुजारी, मानकरी आणि सेवेकरी यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने तुळजापूर शहरात भक्तांना प्रवेशबंदी असून तुळजाभवानी दर्शनासाठी भक्तांनी तुळजापूरात येऊ नये. तसेच, मंदिर संस्थांच्या वेबसाईटवर देवीचे ऑनलाईन दर्शन घ्यावे, असे आवाहन तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे. पुजारी आणि मानकरी यांची कोरोना रॅपिड अँटीजेन तपासणी करुनच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तर, धार्मिक विधीसाठी उपस्थिती संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले (Tuljabhavani Devi Navratri Utsav).
तुळजाभवानी नवरात्र उत्सवासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात पायी चालत येतात. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्व सीमेवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जिल्हा सीमा बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी दिली. तुळजापूर शहराच्या सर्व प्रवेश मार्गावर पोलीस बंदोबस्तासह बॅरिगेटिंग करण्यात आली आहे. तसेच, स्थानिक नागरिकांना त्यांचे ओळखपत्र तपासून प्रवेश दिला जाणार आहे.
नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरात दुचाकी चारचाकी वाहनांसह पायी चालत येणाऱ्या भक्त आणि नागरिकांना प्रवेश बंदी आहे. 17 ऑक्टोबरपासून घटस्थापनेने नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत तुळजापूर शहरात प्रवेशबंदी आदेश लागू असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहनही त्यांनी केले.
तुळजापूर शहर प्रवेशबंदीचे तीनतेरा! मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी https://t.co/aWj0jWvmcC #Tuljapur #Navaratri
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 15, 2020
Tuljabhavani Devi Navratri Utsav
संबंधित बातम्या :
यंदाचा नवरात्र उत्सव भाविकांविनाच, कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुळजापुरात भाविकांना प्रवेशबंदी