गृहिणींचे बजेट कोलमडले, ऐन सणासुदीत डाळींचे भाव गगनाला, तूर डाळ 120 रुपये किलो

| Updated on: Oct 05, 2020 | 10:36 PM

15 दिवसांआधी डाळींचे भाव 80-86 रुपये प्रतिकिलो होते. सध्या बाजारात तूर डाळ 120 रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे.

गृहिणींचे बजेट कोलमडले, ऐन सणासुदीत डाळींचे भाव गगनाला, तूर डाळ 120 रुपये किलो
Follow us on

नवी मुंबई : ऐन सणासुदीचे दिवस जवळ येऊन ठेपलेले असताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (Tur dal Rates Increases) धान्य मार्केटमध्ये डाळींच्या भावात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली पाहायला मिळत आहे. दसरा, दिवाळी सारखे मोठे सण समोर असताना गेल्या आठ दिवसांत तुरडाळीच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे. 15 दिवसांआधी डाळींचे भाव 80-86 रुपये प्रतिकिलो होते. सध्या बाजारात तूर डाळ 120 रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे (Tur dal Rates Increases).

महाराष्ट्रात लातूर, अकोला, गुजरात या ठिकाणांहून तूर डाळीची आवक होत असते. महाराष्ट्रात डाळींचा दर 115 रुपये प्रतिकिलो तर गुजरात मधून येणाऱ्या डाळींचा दर 118 ते 120 रुपये आहे. तर मूग, उडद आणि चणा या डाळींच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे. डाळींचा भाव 100 पेक्षा कमी असणे अपेक्षित आहे. पण, सध्या डाळींच्या दरात 15 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. काही व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डाळींच्या दरात अजून 10 ते 15 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, काही मोठे व्यापारी मुद्दाम डाळींची आवक कमी करुन दरात वाढ करत आहे. सध्या कोरोना काळात तांदूळ आणि डाळ प्रत्येक घरी लागते. त्यामुळे आता डाळींच्या भावात वाढ नाही व्हायला पाहिजे, असं मत धान्य मार्केटचे घाऊक व्यपारी हर्ष ठक्कर यांनी सांगितलं.

डाळींच्या साठेबाजीमुळे ही भाव वाढ झालेली आहे. तूर डाळीचे भाव वाढण्याची आता वेळ नाही, असं अनेक व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. सरकारने यावर नियंत्रण केलं पाहिजे, नाहीतर डाळीचे भाव 150 पर्यंत पोहोचतील, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Tur dal Rates Increases

संबंधित बातम्या :

एपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर मनसेचे काठी घुंगरु आंदोलन

एपीएमसीसाठी नवी मुंबई महापालिका आयुक्तांचं ‘मिशन ब्रेक द चेन’, कोरोनाला रोखण्यासाठी अँटीजन टेस्ट