चेन्नई : 42 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीने नवऱ्यासमोरच आपल्या एक्स-बॉयफ्रेण्डची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार तामिळनाडूत उघडकीस आला आहे. मल्ल्याळम अभिनेत्री एस. देवीने हातोड्याने डोक्यावर वार करुन 38 वर्षीय एम. रवी यांची हत्या (TV Actress Kills Ex Boyfriend) केल्याचा आरोप आहे.
मयत व्यक्तीने प्रेमसंबंध ठेवण्याची बळजबरी केल्यामुळेच आपण त्याचा जीव घेतल्याचा दावा एस देवीने केल्याचं पोलिसांनी
सांगितलं. तामिळनाडूतील कोलठूरमध्ये सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. आरोपी एस देवीच्या बहिणीच्या राहत्या घरी हे
हत्याकांड झालं.
हत्येनंतर आरोपी एस देवी पोलिसांना शरण गेली. मात्र पोलिसांनी तिचा 52 वर्षीय पती बी शंकर, बहीण एस लक्ष्मी आणि तिचा पती सावरियार यांनाही बेड्या ठोकल्या आहेत. कोर्टाने चौघांची रवानगी तुरुंगात केली आहे. मयत रवी हा चित्रपट सृष्टीत तंत्रज्ञ होता.
मूळ मदुराईचा असलेला रवी चेन्नईत राहत होता. आठ वर्षांपूर्वी त्याची ओळख एस देवीशी झाली. एस देवी त्यावेळी मालिकांमध्ये लहान-मोठ्या भूमिका करत असे. ओळखीचं रुपांतर मैत्री आणि प्रेमात झालं.
सहा वर्ष ते दोघं रिलेशनशीपमध्ये होते, परंतु दोन वर्षांपूर्वी एस देवीचा पती शंकर आणि इतर कुटुंबीयांना तिच्या अफेअरविषयी समजलं. तिच्यावर कुटुंबाने नातेसंबंध तोडण्यासाठी दबाव टाकला. अखेर तिने रिलेशनशीपमध्ये सुटका करुन घेतली.
हेही वाचा : लग्न मोडले, परिचारीकेचे नग्न फोटो व्हायरल, आरोपी डॉक्टर अटकेत
रवी अचानक एस देवीचा शोध घेत कोलठूरला येऊन पोहचला. रविवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास तो देवीची बहीण लक्ष्मीच्या घरी आला आणि बहिणीशी आपली पुनर्भेट करुन देण्याची गळ घालू लागला. लक्ष्मीने फोन करुन आपल्या बहिणीला बोलावून घेतलं. त्यामुळे दोघं रात्रीतच लक्ष्मीच्या घरी दाखल झाले.
देवीला बघून रवीने पुन्हा तिच्याकडे एकत्र येण्याची मागणी केली. तेव्हा चिडलेल्या देवीने हातोड्याने त्याच्या डोक्यावर वार केले. बेशुद्ध झालेल्या रवीच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर देवीने राजमंगलम पोलिसात जाऊन घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी लक्ष्मीच्या घरी जाऊन रवीला हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. त्यानंतर पोलिसांनी देवीला अटक केली. तसंच तिचा पती, बहीण आणि मेव्हण्यालाही जीवघेणा हल्ला केल्याच्या आरोपाखाली (TV Actress Kills Ex Boyfriend) बेड्या ठोकल्या.