मुंबई : दिवाळीच्या माहोलात आज सगळीकडे भाऊबीज साजरी केली जाते आहे. भाऊ-बहिणीच्या हळव्या नात्याचा बंध उलगडणारा हा सण सगळीकडे उत्साहाने साजरा केला जातो. अशावेळी आपले कलाकार कसे मागे राहतील बरं? मालिका विश्वात अशा भाऊ-बहिणींच्या (Real Life Brother Sister) अनेक जोड्या आहेत. मात्र, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याची कल्पनाच नाही (TV Celebrities Real Life Brother Sister).
पडद्यावर भाऊ-बहिणींची भूमिका साकारणारे कलाकार खऱ्या आयुष्यातही भावंडे आहेत, असे फार क्वचितच आढळते. मात्र, हिंदी मनोरंजन विश्वात अशा खऱ्याखुऱ्या भाऊ-बहिणींच्या जोड्याही कार्यरत आहेत.
‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेत ‘अंबर’ची भूमिका साकारणारे अभिनेता वरुण बडोला आणि ‘क्वीन’ चित्रपटात कंगनाच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अलका कौशल हे खऱ्या आयुष्यात एकमेकांचे बहिण भाऊ आहेत. वरुणने यापूर्वी ‘अस्तित्त्व-एक प्रेम कथा’, ‘कोशिश-एक आशा’ यासारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. तर, चित्रपटांव्यतिरिक्त अलकानेही ‘स्वरागिणी’सह अनेक लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.
लोकप्रिय मालिका ‘मर्यादा’नंतर अभिनेत्री रिद्धि डोगराला प्रचंड लोकप्रियता मिळाली. अभिनयात करिअर सुरू करण्यापूर्वी रिद्धि श्यामक दावर ग्रुपमध्ये डान्सर होती. रिद्धिचा भाऊ अक्षय डोगरासुद्धा एक सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आहे. ‘इस प्यार को क्या नाम दूं’ या मालिकेतील त्याच्या व्यक्तिरेखेला लोकांची चांगलीच पसंती मिळाली (TV Celebrities Real Life Brother Sister).
पडद्यावर भाऊ-बहिणींची भूमिका साकारणारे कलाकार खऱ्या आयुष्यातही भावंडे आहेत, असे फार क्वचितच आढळते. लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दयाबेनचा भाऊ सुंदरची भूमिका साकारणारा मयूर खऱ्या आयुष्यातही त्यांचा भाऊ आहे. दिशा आणि मयूर वाकानी या दोघांची केमिस्ट्री या शोमध्ये दिसून येते. दिशाने अनेक चित्रपट, टीव्ही मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. तर, मयूर अभिनेता असण्याबरोबरच एक उत्तम चित्रकार आणि शिल्पकारही आहे. मयूरने त्याच्या टीमसह मिळून तयार केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्यासाठी त्याला 4 कोटी रुपये मिळाले होते.
‘ये रिश्ता क्या केहलाता है’ या मालिकेत ‘दादी’ साकारणाऱ्या अभिनेत्री विनिता मलिक या सुप्रसिद्ध अभिनेते आलोक नाथ यांच्या ‘भगिनी’ आहेत. अभिनेत्री विनिता मलिक यांनी ‘कसौटी जिंदगी की’, ‘काव्यांजली’ यासारख्या अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमधे काम केले आहे. तर, त्यांचा भाऊ अर्थात अभिनेते आलोक नाथ चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कलाकार आहेत.
(TV Celebrities Real Life Brother Sister)
Photo : पाहा तुमच्या लाडक्या कलाकारांचे रिअल लाइफमधील बहीण-भाऊhttps://t.co/xY1qVqDZF1
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 16, 2020