टीव्ही 9 मराठीकडून सायबर सेलकडे तक्रार, मॉर्फ इमेज पसरवल्या प्रकरणी गंभीर दखल

| Updated on: Oct 24, 2020 | 10:37 PM

गेल्या काही दिवसांपासून टीव्ही 9 मराठीच्या मूळ बातमीमध्ये बदल करुन चुकीच्या पद्धतीने बातम्या व्हायरल केल्या जात आहेत.

टीव्ही 9 मराठीकडून सायबर सेलकडे तक्रार, मॉर्फ इमेज पसरवल्या प्रकरणी  गंभीर दखल
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून टीव्ही 9 मराठीच्या मूळ बातमीमध्ये बदल करुन चुकीच्या पद्धतीने बातम्या व्हायरल केल्या जात आहेत. आज (शनिवार) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंबंधीची बातमीत देखील चुकीच्या पद्धतीने बदल करुन त्याचा स्क्रीनशॉट सोशल मिडियाद्वारे व्हायरल केला गेला. यासंबंधी टीव्ही 9 मराठीने सायबर सेलकडे तक्रार केली आहे. (TV9 Marathi Complaint Cyber Cell Against Who Morf And Spread Wrong Image)

टीव्ही 9 मराठीच्या लोगोखाली काही बातम्या शब्द बदल करुन विनाकारण खोडसाळपणे पसरवल्या जातात. त्या बातम्यांनी समाजात चुकीचा अर्थ जाण्याचे बरीचशी शक्यता असते. त्यामुळे टीव्ही 9 मराठीने सायबर सेलकडे तक्रार दाखल करुन संबंधितांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून असे प्रकार सातत्याने घडत आहेत. टीव्ही 9 मराठीची बातमी चुकीच्या पद्धतीने व्हायरल केली जाते. संबंधित लोक टीव्ही 9 मराठीच्या लोगोखाली चुकीची बातमी लिहितात. तसंच मॉर्फिंग करुन तो स्क्रीनशॉट सोशल मिडीयात व्हायरल करतात. यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो.

टीव्ही 9 मराठीने या सगळ्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन अधिकृतपणे सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी टीव्ही 9 ने सायबर सेलकडे केली आहे.

सायबर सेलने देखील टीव्ही 9 च्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. असे प्रकार कोण करतंय, त्यांचा या पाठीमागे हेतू काय आहे हे लवकरच आम्ही शोधू, असा विश्वास सायबर सेलने व्यक्त केला आहे.

(TV9 Marathi Complaint Cyber Cell Against Who Morf And Spread Wrong Image)