नाशिक : नाशिकमधील जुळ्या बहीण भावाने दहावीच्या परीक्षेत समान टक्केवारी मिळवली (SSC Result Twins Brother Nashik) आहे. या दोघांना दहावीत 88.20 टक्के मिळाले आहेत. हे दोघेही नाशिकच्या बॉईज टाऊन पब्लिक स्कूलमध्ये शिकत होते. सध्या त्यांच्या टक्केवारीमुळे राज्यभरात हा कुतुहलाचा विषय ठरला आहे (SSC Result Twins Brother Nashik).
ओम आणि शिवानी या जुळ्या भावंडांचा जन्म 1 मे 2004 रोजी झाला आहे. वडील सुनील बिरारी आणि आई योगिता बिरारी यांची ही जुळी मुलं आहेत. ओम आणि शिवानी ही दोघं मुलं अभ्यासात हुशार आहेत. दररोज वेळेवर अभ्यास करणारे, मात्र यांना सारखे टक्के पडतील हे कोणाच्याच ध्यानीमनी नव्हतं. कारण मागील परिक्षांमध्ये त्यांना कमी जास्त मार्क्स पडत होते. मात्र दहावीत त्यांना प्रत्येक विषयात कमी जास्त मार्क्स झाले. पण टक्के मात्र सेम टू सेम मिळाले आहेत. त्यामुळे या दोघांवर सद्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
या दोघांच्या टक्केवारीने आई वडिलांचा आनंद ही गगनात मावेनासा झाला आहे. जुळ्यांचा चेहरा राम और शाम असतो असे अनेक चित्रपटात वास्तवात आढळून येते. मात्र मुलगा आणि मुलगी हा जन्मताच बदल असलेले ओम शिवानी बौद्धिक क्षमतेत सारखे ठरले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या पराक्रमाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
SSC Result 2020 | राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के, कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के?