मुंबई : सोशल मीडियाच्या जगात दररोज नवनवीन ट्रेंड येत असतात. यामध्ये सामान्य नागरिक ते सेलिब्रिटी आणि नेते मंडळीपर्यंत सर्वच तो ट्रेंड फॉलो करतात. गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर एक नवा ट्रेंड सुरु आहे. #SareeTwitter, हा ट्रेंड सध्या ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामध्ये महिला त्यांच्या साडीतील फोटो ट्विटरवर शेअर करत आहेत. काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनीही हा ट्रेंड फॉलो केला आहे. त्यांनी बुधवारी (17 जुलै) सकाळी त्यांचा साडीतील एक फोटो ट्वीट केला. हा फोटो त्यांच्या लग्नाच्या वेळेचा आहे.
Morning puja on the day of my wedding (22 years ago!) #SareeTwitter pic.twitter.com/EdwzGAP3Wt
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 17, 2019
प्रियांका गांधी यांनी बुधवारी सकाळी एक फोटो ट्वीट करत ’22 वर्षांपूर्वी माझ्या लग्नाच्या दिवशी सकाळच्या पूजेचा फोटो’, असं कॅप्शन दिलं. यासोबत त्यांनी #SareeTwitter या हॅशटॅगचाही वापर केला. 18 फेब्रुवारी 1997 रोजी व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांच्याशी प्रियांका गांधी यांचं लग्न झालं होतं.
प्रियंका गांधी या ट्विटरवर नेहमी सक्रिय राहातात. त्या अनेक मुद्यांवर आपली मतं मांडत असतात, तर कधी विरोधकांवर निशाणाही साधतात.
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही या ट्रेंडला फॉलो करत पैठणी नेसलेला फोटो शेअर केला आहे.
It’s so beautiful to see so many ladies and a few men participate in #SareeTwitter Here’s one of my favourites #Paithani ? Kudos to all our weavers for keeping this priceless tradition alive ???? pic.twitter.com/zWHub1q7yR
— Renuka Shahane (@renukash) July 16, 2019
ट्विटरवर गेल्या दोन दिवसांपासून #SareeTwitter हा ट्रेंड सुरु आहे. आतापर्यंत अनेक सिनेमा कलाकार, नेते मंडळी, महिला अधिकारी, महिला पोलीस अधिकाऱ्यांनी साडीमध्ये त्यांचे फोटो ट्वीट केले आहेत. तर पुरुषांकडून ट्विटरवर #KurtaTwitter हा ट्रेंड फॉलो केला जात आहे.
Because #SareeTwitter & I cannot miss tweeting with this hashtag 🙂 pic.twitter.com/VTC2ISlvoy
— Priyanka Chaturvedi (@priyankac19) July 15, 2019
काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही त्यांच्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. तसेच, काँग्रेस नेत्या रागिनी नायक यांनीही त्यांच्या अनेक फोटो शेअर केल्या.
I love to be draped in the most graceful and elegant attire ever #SareeTwitter pic.twitter.com/oJouw9abCG
— Ragini Nayak (@NayakRagini) July 16, 2019
राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर साडीमधील फोटो शेअर केले.
You can’t go wrong in a saree…super comfortable #SareeTwitter pic.twitter.com/wSgwU2Dd4G
— Chitra Kishor Wagh (@chitrancp) July 16, 2019
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमनेही तिचा साडीतील एक फोटो शेअर केला आहे.
I completely agree with this trend , nothing can match the elegance and beauty of a Saree ! So sharing my most special saree moment ? #SareeTwitter pic.twitter.com/L20p3eAxZl
— Yami Gautam (@yamigautam) July 16, 2019
साडी ट्विटरच्या ट्रेंडनंतर मुंबई पोलिसांनी #KhakiSwag ट्रेंड सुरु केला. यामध्ये पोलीस अधिकारी त्यांच्या खाकी वर्दीतील फोटो शेअर करत आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर काही फोटो शेअर केले आहेत.
Khaki has its own charm, doesn’t it? #KhakiTwitter
A shout out to all our police friends across the country, let’s share some #KhakiSwag in a uniform we all take pride in, with #KhakiTwitter Do tag fellow officers, more the ‘Khakier’ pic.twitter.com/Lr2OU97o7Z
— Mumbai Police (@MumbaiPolice) July 16, 2019
Here is my #KhakiTwitter and #SareeTwitter pic.twitter.com/rMDQoxgE4x
— shobha bhutada (@shobhapbhutada) July 17, 2019
Here is #SareeTwitter and #KhakiTwitter in one picture.
My daughter and my husband in one pic, ladies and gentlemen. pic.twitter.com/o0mplzVYoi— Preeti Maithil (@preetimaithil) July 16, 2019