नांदेड : देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात (Corona Patient Death Nanded) आहेत. याच दरम्यान नांदेडमध्ये चोवीस तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नांदेडकरांची धाकधूक वाढली (Corona Patient Death Nanded) आहे.
नांदेडमध्ये काल (30 एप्रिल) आणखी तीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 4 वर पोहोचली आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने नांदेडच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच येथील नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
नांदडेमध्ये एका दिवसात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. मृत झालेले रुग्ण एक सेलू आणि दुसरा पीर बु-हाननगर येथे राहत होते. मृतांमध्ये एका 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांना इतर गंभीर आजारही होते.
या महिलेवर नांदेडच्या विष्णुपुरीच्या शासकीय दवाखान्यात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच या महिलेचा काल रात्री 10.15 वाजता मृत्यू झाला. 29 एप्रिलला या महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते.
नांदेडमध्ये आढळलेले तिन्ही रुग्ण हे पंजाबमधील भाविकांना सोडण्यास गेलेले बस चालक आहेत. हे बस चालक पंजाबहून नांदेडमध्ये परतल्यावर या सर्वांची तपासणी केली असता तिन्ही बस चालकांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नांदेडहून पंजाबला गेलेल्या 25 जणांना कोरोनाची लागण
नुकतेच महाराष्ट्रातील नांदेडमधून पंजाबला परतलेल्या भाविकांनी चिंता वाढवली आहे. 29 एप्रिलला पंजाबमध्ये 37 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 25 जण हे महाराष्ट्रातील नांदेडच्या श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथून आलेले भाविक आहेत. नांदेडहून पंजाबमध्ये परतलेल्या 36 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचं पुढे आलं आहे.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत 10 हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर 459 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 1773 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.
संबंधित बातम्या :
Marathwada Corona Update | लढवय्या मराठवाडा कोरोनाचा मुकाबला कसा करतोय?
नांदेडहून पंजाबला परतलेल्या आणखी 25 भाविकांना कोरोना, रुग्णसंख्या वाढण्याची भीती