दोन पिढ्या दृष्टीहीन, बीडच्या साठे कुटुंबीयांची संकटांवर मात

| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

बीड : बीडमध्ये एक असं कुटुंब आहे, ज्या कुटुंबातील सर्वच सदस्य दृष्टीहीन आहेत. दुःख काय असते आणि त्या दुःखावर कशी मात केली जाते, याच ज्वलंत उदाहरण म्हणजे बीडच्या साक्षाळ पिंपरी गावातील हे कुटुंब. विशेष म्हणजे मागील दोन पिढयांपासून बीडचे साठे कुटुंब हे दृष्टीहीन आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह लोकगीत सादर करुन ते स्वतःचा उदरनिर्वाह करतात. साठे कुटुंबात […]

दोन पिढ्या दृष्टीहीन, बीडच्या साठे कुटुंबीयांची संकटांवर मात
Follow us on

बीड : बीडमध्ये एक असं कुटुंब आहे, ज्या कुटुंबातील सर्वच सदस्य दृष्टीहीन आहेत. दुःख काय असते आणि त्या दुःखावर कशी मात केली जाते, याच ज्वलंत उदाहरण म्हणजे बीडच्या साक्षाळ पिंपरी गावातील हे कुटुंब. विशेष म्हणजे मागील दोन पिढयांपासून बीडचे साठे कुटुंब हे दृष्टीहीन आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह लोकगीत सादर करुन ते स्वतःचा उदरनिर्वाह करतात.

साठे कुटुंबात आजोबापासून ते नातवापर्यंत सर्वचजण अंध आहेत. याच अंधत्वावर मात करत त्यांनी लोक कला अंगिकारली आणि हेच साधन त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनलं. पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी हे कुटुंब गावोगाव फिरून लोकगीत सादर करतात आणि त्यातून मिळालेल्या पैशातून ते स्वतः जीवन जगतात.त्यांचा हा संघर्ष तब्बल चाळीस वर्षांपासून सुरू आहे. आजोबापासून तर नातवापर्यंतचा हा संघर्ष आजतागायत सुरूच आहे. मात्र सद्या त्यांची मोठी परवड सुरू आहे. आता जगायचं कसं हा गंभीर प्रश्न सध्या त्यांच्यासमोर उभा राहिलाय.

याच घरात जन्मत:अंध असलेला दहा वर्षाचा सम्राट उत्तम असे तबलावादन करतो. कसलेही शिक्षण नाही. मात्र या कलेत तो तरबेज आहे. सम्राटच्या एका डोळ्याची नस दबली गेल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सम्राटला दृष्टी मिळेल यासाठी कुटुंबाची आस लागली आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांनी डॉ. तात्याराव लहाने यांची भेट घेतली. मात्र लहान वयात सम्राटची प्रतिकार शक्ती कमी पडत असल्याने तो मोठा झाल्यावर डोळ्याची शस्त्रक्रिया करू असे आश्वासन डॉ. लहाने यांनी दिले होते. आता सम्राट दहा वर्षांचा आहे, आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने सर्वच कुटुंब हतबल झाले आहे. दृष्टी मिळाली तर संपूर्ण कुटुंबाचे देखभाल करता येईल असं अंध सम्राटला वाटत आहे.

साठे कुटुंब हे मागासवर्गीय आहे.  साक्षाळ पिंपरी या गावचे मूळ रहिवासी कोणतेच पुस्तकी ज्ञान नसले, तरीही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिलेल्या थोर उपकारांची या अंध कुटुंबाला जाण आहे. वर्षानुवर्षे परवड होतेय यात गावाने मदतीचा हात दिला. परंतु आंबेडकरी अनुयायांनी अद्याप कसलीच मदत केली नाही, शिवाय बीड जिल्ह्यातील मातब्बर लोकप्रतिनिधीनी ढुंकूनही पाहिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

केवळ लोकगीत गाऊन हे साठे कुटुंब स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांनाही जगण्याची उमेद असली तरी समाजाकडून कसलीच मदत मिळत नसल्याने ते हाताश झाले आहेत. मुरलीधर साठे यांचे जावईही अंधच आहेत. तेही याच गावात राहतात. महाराष्ट्रातील जनतेनी मदतीचा हात दिला तर जगण्यासाठी एक आधार मिळेल अशी त्यांची माफक अपेक्षा आहे .

मराठी माणसांच्या हक्कासाठी हे ब्रीद वाक्य टीव्ही 9 मराठीचे आहे. आतापर्यंत टीव्ही 9 मराठीने महाराष्ट्रातील वंचितांची आर्त हाक तुमच्यासमोर मांडली आहे. तुम्ही सुद्धा वेळोवेळी साद दिलीच आहे. शोषित, पीडितांना मदत करण्याची तशी महाराष्ट्राची दानतच आहे म्हणूनच आम्ही महाराष्ट्रातील आमच्या तमाम दर्शकांना मदतीचे आवाहन करीत आहोत.