नवी दिल्ली: मोदी सरकार कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Union Budget 2019) 1 फेब्रुवारीला मांडणार आहे. हे अंतरिम बजेट (Interim Budget 2019) असेल. मात्र अर्थसंकल्पापूर्वीच दिल्लीत राजकीय भूकंप घडला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगच्या दोन सदस्यांना तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. पी सी मोहनन आणि जे वी मीनाक्षी यांनी आपला राजीनामा दिला. मोदी सरकार बजेटपूर्वी आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडणार नसल्याने या दोन्ही अधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे रोजगारासंबंधीच्या या अहवालावरुन वादंग सुरु असल्याचं चित्र आहे.
पी सी मोहनन आणि जे व्ही मीनाक्षी यांच्यानंतर आता राष्ट्रीय सांख्यिकी आयोगात केवळ मुख्य सांख्यिकी प्रवीण श्रीवास्तव आणि निती आयोगाचे सदस्य अमिताभ कांत हे दोनच सदस्य राहिले आहेत.
पी सी मोहनन हे सदस्यपदासोबतच चेअरमनपदाचा भार सांभाळत होते. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसकडील बेरोजगारांची आकडेवारी जाहीर करु दिली जात नाही, असा दावा मोहनन यांचा आहे. माहिती लपवली जात असल्याने त्यांनी राजीनामा देत असल्याचं म्हटलं. ही आकडेवारी डिसेंबर 2018 मध्येच प्रसिद्ध करायला हवी होती, मात्र तसं झालं नाही, असं मोहनन यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, अर्थमंत्रालयाचा भार असलेले पियुष गोयल हे 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर करतील. यापूर्वी मोदी सरकार संपूर्ण बजेट मांडणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र सरकार पूर्ण बजेट न मांडता अंतरिम बजेट मांडणार असल्याचं अर्थमंत्रालयाने स्पष्ट केलं.
काय आहे केंद्रीय सांख्यिकी आयोग?
रंगराजन समितीच्या शिफारशीनंतर 1 जून 2005 रोजी या आयोगाची स्थापना
केंद्रीय सांख्यिकी आयोगाला स्वायत्त संस्थेचा दर्जा
एक चेअरमन आणि चार सदस्य अशी रचना
निती आयोगाचे सीईओ सदस्य असतात (सध्या अमिताभ कांत)
प्रवीण श्रीवास्तव हे सध्या सचिव आहेत
नॅशनल सॅम्पल सर्व्हे आॅफ इंडिया यांसारख्या डेटा जमा करणाऱ्या सरकारी संस्थांसाठी समन्वयक म्हणून काम, डेटा जमवणे, विश्लेषण यात महत्वाची भूमिका
अर्थसंकल्प 2019 (Interim Budget 2019)
अर्थमंत्री पियुष गोयल 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या बजेटबाबत मोदी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. सर्वसामान्य अर्थसंकल्प 2019 (Budget 2019-20) हे निवडणुकीपूर्वी सादर होत असल्याने त्यामध्ये वर्षभराचा संपूर्ण आढावा नसेल. निवडणूक वर्षात सामान्यत: नवं सरकार स्थापन होईपर्यंत चार महिन्यांसाठी प्रशासनिक कार्य आणि विकासकामांवरील खर्चाचा तपशील अंतरिम बजेटमध्ये सादर केला जातो. मात्र विद्यमान भाजप सरकार ही परंपरा तोडून पूर्ण बजेट सादर करण्याची शक्यता होती. पण त्यावर अर्थमंत्रालयाने स्पष्टीकरण देऊन त्यावर पडदा टाकला आहे.
अर्थसंकल्प 2019 कधी सुरु होईल?
केंद्र सरकार संसदेत 1 फेब्रुवारीला बजेट सादर करेल. अरुण जेटलींच्या अनुपस्थितीत अर्थमंत्रालयाच भार पियुष गोयल यांच्याकडे आहे, त्यामुळे तेच सकाळी 11 वा. अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. सर्वात आधी सरकार 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत जमा-खर्चाची माहिती देईल. त्यानंतर अर्थमंत्री आपलं भाषण देतील. 1999 पर्यंत अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वा सादर करण्याची प्रथा होती, मात्र 1999 मध्ये माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली.
बजेट कसं सादर केलं जाईल?
सर्वात आधी संसद भवनात अर्थसंकल्पासंदर्भात कागदपत्र आणली जातील. त्यानंतर कॅबिनेट बैठक होईल. या बैठकीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. या बैठकीत अर्थसंकल्पाबाबत महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णय होतील. त्यानंतर अर्थमंत्री बजेट सादर करतील.
अर्थसंकल्प 2019 Live (Budget Live)
अर्थसंकल्पाचं महाकव्हरेज तुम्ही टीव्ही 9 मराठीवर पाहू शकता. टीव्हीसह तुम्ही वेबसाईट tv9marathi.com वर बजेटची बित्तमबातमी पाहू शकाल. शिवाय तुमच्या मोबाईलवर लाईव्ह टीव्हीद्वारे tv9marathi.com/live-tv बजेट लाईव्ह पाहू शकाल.
याशिवाय तुम्हाला फेसबुकवर www.facebook.com/Tv9Marathi/ आणि ट्विटरवरही twitter.com/TV9Marathi बजेट लाईव्ह पाहता येईल. इतकंच नाही तर टीव्ही 9 मराठीचं न्यूज चॅनेल तुम्ही यूट्यूबवर 24 तास लाईव्ह पाहू शकता. https://www.youtube.com/watch?v=MnU5sDJLAz8