छत्रपतींच्या वंशजाची अभिमानास्पद कामगिरी, उदयनराजेंचे पुत्र थायलंडमध्ये कौतुकपात्र

| Updated on: Sep 29, 2019 | 10:17 AM

उदयनराजे भोसले यांचे पुत्र वीरप्रताप भोसले यांनी आशियाई स्कुबा डायव्हिंग स्पर्धेत वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी प्रमाणपत्र मिळवलं आहे.

छत्रपतींच्या वंशजाची अभिमानास्पद कामगिरी, उदयनराजेंचे पुत्र थायलंडमध्ये कौतुकपात्र
Follow us on

सातारा : नुकतेच भाजपवासी झालेले साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सुपुत्राने अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट चौदावे वंशज असलेल्या वीरप्रताप भोसले (Veerpratap Bhosale Scuba Diving) यांनी आशियाई स्कुबा डायव्हिंग स्पर्धेत वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी प्रमाणपत्र मिळवलं आहे.

वीरप्रताप भोसले यांनीही आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेला साजेशी कामगिरी केल्याचं दिसत आहे. नुकतंच थायलंडमधील फुकेतमध्ये आशियाई स्कुबा डायव्हिंग स्पर्धा झाली होती. यामध्ये 14 वर्षीय वीरप्रताप सहभागी झाले होते. त्यांनी स्कुबा डायव्हिंगचं (Veerpratap Bhosale Scuba Diving) प्रमाणपत्र मिळवल्याची माहिती उदयनराजेंनी दिल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.

वीरप्रताप यांच्या यशाबद्दल खुद्द उदयनराजेंनी तोंडभरुन कौतुक केलं आहे. आपल्या मुलाने आपल्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने लोकांची काळजी घ्यावी, अशा पद्धतीने आपण त्याला प्रशिक्षित केलं आहे. स्कुबा डायविंग हा त्याचा छंद आहे. त्याची कामगिरी अभिमानास्पद असल्याचं उदयनराजे भोसले म्हणाल्याची माहिती आहे.

छत्रपती उदयनराजे भोसले यांना दोन अपत्यं आहेत. ज्येष्ठ पुत्र वीरप्रताप भोसले, तर दुसरी कन्या नयनतारा भोसले. वीरप्रताप सध्या चेन्नईत शिक्षण घेत असून मुलगी नयनतारा पुण्यामध्ये शिक्षण घेते. वीरप्रताप यांची कामगिरी भोसले कुटुंबासह सातारकरांसाठी अभिमानास्पद ठरत आहे.

कॉलर माझी आहे, मी चावीन नाहीतर फाडून टाकेन : उदयनराजे भोसले

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काहीच दिवसांपूर्वी उदयनराजेंनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपचा झेंडा हाती धरला होता. मात्र शरद पवार कायम आदरणीय असतील, असं सांगायला ते विसरले नव्हते.

“शरद पवार मला वडिलांच्या स्थानी आहेत. लोकसभा निवडणुकीला जर शरद पवार उभे राहिले तर मी उभा राहणार नाही. फक्त पवार साहेबांनी त्यांचा दिल्लीतला बंगला आणि गाडी मला वापरायला द्यावी.” असं म्हणत उदयनराजे भोसले काहीसे भावूक झालेले पाहायला मिळाले होते.

उदयनराजेंनी त्यांच्या नावावर अनेक गुन्हे दाखल असल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “मी नेहमीच अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. त्यासाठी ऐन तारूण्यात मी तुरुंगात गेलो. मात्र, अन्यायाविरोधात लढत राहिलो.