मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या हॉटेल-रेस्टोरंटबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Uddhav Thackeray on Hotel and restaurant opening ). राज्यातील रेस्टोरंट संघटना प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणार असाल तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मी हॉटेल सुरु करण्यासाठी परवानगी देतो. मात्र, एकदा हॉटेल सुरु केल्यावर ते पुन्हा बंद करावे लागणार नाहीत, याची जबाबदारी हॉटेल मालक आणि चालकांवर असेल, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मला महाराष्ट्र एक मॉडेल बनवायचा आहे. जसं माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम जगभरात वाचनात किंवा पाहण्यात नाही. महाराष्ट्रात या मोहिमेत जनतेचा सहभाग आहे. याला चळवळ करायचं आहे. सेल्फ डिफेन्ससाठी ज्यूडो, कराटेसारखे क्लास असतात, ज्यूडो कराटे शिकण्याचा मीही प्रयत्न केला होता, पण जमलं नाही. त्यात ब्लॅक बेल्ट हे शिकणाऱ्याचं एक स्वप्न असतं. तसा मास्क हा आता विषाणूंपासून संरक्षणासाठी ब्लॅक बेल्ट आहे. व्हायरसपासून सेल्फ डिफेन्स, सेल्फ प्रोटेक्शनसाठी मास्क अत्यावश्यक आहे. या गोष्टींची खबरदारी घेण्याची तयारी असेल तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या आसपास मी हॉटेल सुरु करण्याची परवानगी देईल.”
राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती संबंधितांना पाठविली आहेत.ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्यातील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करताना म्हणाले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 28, 2020
“एकदा हॉटेल सुरु केल्यावर मी पुन्हा पाहायला येणार नाही, ती तुमची जबाबदारी”
“हॉटेल सुरु केल्यानंतर ते पुन्हा बंद करावे लागणार नाही याची जबाबदारी हॉटेल मालकांवर असेल. हॉटेल मालकच माझे कॅमेरा आहेत. त्यांनीच मला सांगायला पाहिजं की आम्हाला कोरोना नियंत्रण करायचं आहे. थोडे दिवस थांबा. तुम्ही परवानगी द्या. एकदा का हॉटेल सुरु केलं, तर जबाबदारीने चालवले पाहिजे. हॉटेल मालकांनी पुन्हा एकदा विचार करावा आणि हॉटेल कसे चालवणार याची विशेष पद्धत (SOP) सरकारला द्यावी. आणखी काही सूचना असतील तर जरुर करा. पण एकदा हॉटेल सुरू केल्यानंतर मी तुमच्याकडे बघायला येणार नाही. तुम्ही माझे परिवार-सहकारी म्हणून काम केलं पाहिजे. मी कुणावर पाळत ठेवणार नाही,” असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
ज्याचं ज्याचं या महाराष्ट्रावर प्रेम आहे, महाराष्ट्राला आपलं कुटंब मानतात त्यांनी प्रामाणिकपणे या माझं कुटुंब-माझी जबाबदारी या चळवळीत सहभागी झालं पाहिजे. हॉटेल मालकांनी देखील यात सहभागी व्हायला हवं, असंही ते म्हणाले.
हेही वाचा :
शिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं, आठवलेंचं आमंत्रण
सुशांत सिंह प्रकरणी जे छाती बडवून घेत होते, ते आता कुठे गेले? : अनिल परब
व्हिडीओ पाहा :
Uddhav Thackeray on Hotel and restaurant opening