योगीजी, मी तुमच्यापेक्षा वरिष्ठ, माझं ऐका, पीडितांना भेटू द्या : उमा भारती

| Updated on: Oct 02, 2020 | 11:27 PM

माध्यमांना राजकीय नेत्यांना हाथरस  घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊ द्यावी, अशी विनंती भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी केली. त्यांनी याबाबत एका मागोमाग 7 ट्विट केली आहेत. (Uma Bharati demands yogi govt should gave permission to media and political leaders meet hathsar victim family )

योगीजी, मी तुमच्यापेक्षा वरिष्ठ, माझं ऐका, पीडितांना भेटू द्या : उमा भारती
Follow us on

नवी दिल्ली: योगीजी आपण स्वच्छ प्रतिमा असलेले शासक आहात. माध्यमांना राजकीय नेत्यांना हाथरस  घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊ द्यावी, अशी विनंती भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी केली. मी भाजपमध्ये आपली मोठी बहीण आहे, माझ्या विनंतीला नकार देऊ नका, असेही भारतींनी म्हटले आहे. त्या सध्या कोरोना पॉझिटिव्ह असून एम्समध्ये उपचार घेत आहेत. भारती यांनी एका मागोमाग 7 ट्विट केले आहेत.

कोरोना वार्ड मी अस्वस्थ असून कोरोनाबाधित नसते तर सध्या पीडित परिवाराच्या गावात असते. एम्सच्या ऋषिकेश वार्डमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पीडित कुटुंबाला भेटणार असल्याचे उमा भारतींनी म्हटले. काही दिवसांपूर्वी राम मंदिराचे भूमिपूजन झाले आहे.

रामराज्य येणार असल्याचा दावा केला जातोय. मात्र, पोलिसांच्या संशयास्पद कारवाईमुळे उत्तर प्रदेश सरकार आणि भाजपच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. हाथरस घटनेविषयी टीव्हीवरील बातम्यांमधून माहिती मिळाली. सुरुवातीला आपण योग्य कारवाई करत आहात, असे वाटत होते. मात्र, पोलिसांनी पीडित कुटुंबाची नाकाबंदी केली आहे, त्यावरुन विविध शंका घेतल्या जात आहेत.

एसआयटीकडून तपास सुरु असताना पीडितेच्या कुटुंबाला भेटता येत नाही, असा कोणताही नियम नाही. मात्र, कुटुंबीयांना कोणालाच भेटू न दिल्याने संशय निर्माण होतो, असे मत उमा भारतींनी व्यक्त केले. दरम्यान, गेल्या 7 दिवसांपासून उमा भारती कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यामुळे बाबरी मशीद खटल्याच्या निकालालाही त्या उपस्थित राहिल्या नव्हत्या.

हाथरसच्या एसपी, डीएसपी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचे निलंबन

एसआयटीच्या प्राथमिक अहवालानंतर योगी सरकारने ही मोठी कारवाई केली आहे. हाथरसचे एसपी, डीएसपी आणि पोलीस इन्सपेक्टर यांच्यावर योगी सरकारने कारवाई केली आहे. या बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. स्थानिक प्रशासनाविरोधात नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात होता. अखेर योगी सरकारने ही मोठी कारवाई केलीये.

संबंधित बातम्या :

प्रचंड दबावानंतर योगी सरकारची कारवाई, हाथरसचे SP, DSP यांच्यासह बडे अधिकारी निलंबित

योगी सरकार बरखास्त करुन उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; शिवसेनेची मागणी