कैरो : लिबियाच्या किनारपट्टीजवळ समुद्रामध्ये स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणारी बोट बुडाल्याची माहिती आहे. बोटीमधूनवरील सुमारे 74 मजूर बुडाल्याची माहिती आहे. या बोटीमधून मधून एकूण 120 स्थलांतरित मजूर प्रवास करत होते, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतरितांसाठीच्या एजन्सीनं दिली आहे. ही घटना गुरुवारी घडली. लिबिया आणि भूमध्य समुद्रांजवळील देशांनी स्थलांतरित प्रवाशांना जीवरक्षक सोयी पुरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं संयुक्त राष्ट्रांनं म्हटलं आहे. (UN asked to Libya and Mediterranean to change policy for migrants)
बोटीमधून प्रवास करणाऱ्या 120 मजुरांपैकी 47 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर, 74 जण बुडाले आहेत. या बोटीमधून मजूर, महिला आणि लहान मुलं प्रवास करत होते. संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतरितांसाठीच्या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार ही घटना लिबिया जवळील खोमास जवळ घडली. खोमास लिबियाच्या राजधानीपासून 120 किलोमीटरवर आहे.
We call for a change in the evidently unworkable approach to #Libya and the Mediterranean.
In the absence of safeguards for migrants returned to the country, the Libyan SaR zone must be redefined to allow for international life-saving operations. pic.twitter.com/C8Y8t7M93F
— Safa Msehli (@msehlisafa) November 12, 2020
लिबियाच्या कोस्ट गार्ड आणि मच्छिमारांच्या मदतीनं 47 जणांना वाचवण्यात आले. कोस्ट गार्ड आणि मच्छिमारांनी बचावलेल्या मजुरांना लिबियाच्या किनारपट्टीवर आणण्यात आले आहे.
भूमध्य समुद्रातून बोटीमधून प्रवास करणं अधिक धोकादायक झालं आहे. मागील सात वर्षांमध्ये 20 हजारांपेक्षा अधिक जण बुडाले आहेत.
संयुक्त राष्टांच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या माहितीनुसार 1 ऑक्टोंबरपासून बोटी बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 1 ऑक्टोबरपासून 8 बोटी भूमध्य समुद्रांमध्ये दुर्घटनाग्रस्त झाल्या आहेत.
लिबीया आणि भूमध्य समुद्रातून प्रवास करताना स्थलांतरित मजुरांसाठी आवश्यक त्या जीवरक्षक सुविधांच्या सोयी पुरवणे गरजेचे आहे, असं संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्यावतीनं सांगण्यात आले आहे.
भूमध्य समुद्रात दोन दिवसांपूर्वी आणखी एक बोट बुडाली होती. याघटनेमध्ये 19 स्थलांतरित मजूर बुडाले होते. यामध्ये 2 लहान मुलं आणि महिलांचा समावेश होता.
लीबियात होडी उलटली, महिला आणि लहान मुलांसह एकूण 120 प्रवाशी, 74 जण बुडाले : संयुक्त राष्ट्रhttps://t.co/gGtnGrHnYr#Libia #UN #BoatSunk
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2020
संबंधित बातम्या :
लिबियात अपहरण झालेल्या 7 भारतीयांची महिन्यानंतर सुटका
लीबियात होडी उलटली, महिला आणि लहान मुलांसह एकूण 120 प्रवाशी, 74 जण बुडाले : संयुक्त राष्ट्र
(UN asked to Libya and Mediterranean to change policy for migrants)