Union Finance Minister Nirmala Sitharaman : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (FM Nirmala Sitharaman) यांनी 20 लाख कोटी रुपयाचं ‘स्वावलंबी भारत अभियान’ पॅकेज जाहीर केलं. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी तीन भागांमध्ये पत्रकार परिषद घेत या पॅकेजमध्ये कुठल्या क्षेत्राला काय मिळणार याबाबत सविस्तर माहिती दिली. आज झालेली पत्रकार परिषद ही शेती आणि शेती संबंधित व्यवसाय केंद्रीत होती. यावेळी शेती संबंधित उद्योग धंद्यांना तब्बल 1 लाख कोटीचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तसेच, भोळ्या शेतकऱ्यांची लुबाडणूक थांबवण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यात सुधारणा करणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
शेती आणि शेतीपुरक व्यवसायांना आधार देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी 8 महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी कृषी आणि कृषी निगडित क्षेत्राला 1 लाख कोटी, फळ प्रक्रिया उद्योगासाठी 10 हजार कोटी, मत्स्यसंपदा योजनेसाठी 20 हजार कोटी, पाळीव प्राणी लसीकरणासाठी 13 हजार 343 कोटी, दुग्धव्यवसाय पायाभूत सुविधांसाठी 15 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
तसचे, लॉकडाऊन दरम्यान 74,300 कोटींपेक्षा जास्त किंमतीची किमान आधारभूत खरेदी करण्यात आली आहे. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत 18,700 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,400 कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिली.
FM Nirmala Sitharaman LIVE Updates
अर्थमंत्र्यांचे महत्त्वाचे मुद्दे
?कृषी आणि कृषी निगडित क्षेत्राला 1 लाख कोटी
?फळ प्रक्रिया उद्योगासाठी 10 हजार कोटी
?मत्स्यसंपदा योजनेसाठी 20 हजार कोटी
?पाळीव प्राणी लसीकरणासाठी 13 हजार 343 कोटी
?दुग्धव्यवसाय पायाभूत सुविधांसाठी 15 हजार कोटी pic.twitter.com/Gk1X6BUhPN— TV9 Marathi (@TV9Marathi) May 15, 2020
LIVETV | 53 कोटी पशुधनासाठी लसीकरण, 13 हजार 343 कोटी रुपयांची तरतूद : निर्मला सीतारमण लाईव्ह https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/GUlKVu73Fm
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 15, 2020
LIVE : 1 लाख कोटी शेतीशी निगडीत उद्योग धंद्याला देण्यात येणार https://t.co/geObg8OTjv #NirmalaSitharaman pic.twitter.com/a8jFLzUcOM
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 15, 2020
LIVETV | लॉकडाऊन कालावधीत दुधाची मागणी 20-25% कमी झाली. सन 2020-21 मध्ये दुग्ध सहकारी संस्थांना वार्षिक 2% दराने व्याज सवलती देण्याची नवीन योजना. यामुळे 2 कोटी शेतकऱ्यांना 5000 कोटी रुपयांची अतिरिक्त लिक्विडीटी : निर्मला सीतारमण लाईव्ह https://t.co/ImprYi4kJH #NirmalaSitharaman pic.twitter.com/dsWLvop4fJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 15, 2020
LIVE : केंद्रीय अर्थमंत्रालयाची पत्रकार परिषद सुरु https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/A80EXX1MT2
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 15, 2020
20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज
कोरोना संकंटाचा सामना करताना नव्या संकल्पानुसार पंतप्रधान मोदी यांनी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे आर्थिक पॅकेज स्वावलंबी भारताचा संकल्प साकार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. हे पॅकेज 20 लाख कोटी रुपयांचं असेल, असे मोदींनी सांगितलं.
नुकतंच सरकारने कोरोना संकंटाशी संबंधित ज्या आर्थिक घोषणा केल्या होत्या. जे रिझर्व्ह बँकेचे निर्णय होते आणि आज ज्या आर्थिक पॅकेजची घोषणा होत आहे त्याला जोडलं तर हे पॅकेज जवळपास 20 लाख कोटींचं पॅकेज आहे. हे पॅकेज भारताच्या जीडीपीचं जवळपास 10 टक्के एवढे आहे. देशाच्या विविध वर्गांना यामार्फत आर्थिक सहकार्य मिळेल. 20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेज 2020 मध्ये स्वावलंबी भारतच्या अभियानाला एक वेगळी गती देईल. स्वावलंबी भारतच्या संकल्पाला सिद्ध करण्यासाठी या पॅकेजमध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. हे पॅकेज कुटीर उद्योग, गृह उद्योग, लघु उद्योग अशा अनेकांसाठी आहे.
देशातील नागरिकांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी आणि श्रमिक मजुरांसाठी हे आर्थिक पॅकेज आहे. हे आर्थिक पॅकेज प्रामाणिकपणे टॅक्स भरुन देशाच्या विकासात आपलं योगदान देणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी आहे. गेल्या सहा महिन्यात व्यवस्था सक्षम झाली. त्यामुळेच भारताच्या प्रत्येक (FM Nirmala Sitharaman) गरिबापर्यंत केंद्र सरकारची आर्थिक मदत पोहोचली.
संबंधित बातम्या :
Aatm Nirbhar Bharat : 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये कुठल्या क्षेत्राला काय मिळणार?
One Nation One Ration | काय आहे ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना?