नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘अनलॉक 3’ च्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यानुसार, येत्या 5 ऑगस्टपासून देशभरात जिम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसेच नाईट कर्फ्यूही हटवला आहे. मात्र मेट्रो, रेल्वे आणि सिनेमागृहावर देशभरात बंद राहणार आहे. येत्या 31 ऑगस्टपर्यंत ‘अनलॉक 3’ लागू असणार आहे. (Unlock 3 New Guidelines)
‘कोव्हिड19’ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेला ‘अनलॉक 2’ येत्या शुक्रवारी (31 जुलै) संपणार आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात केंद्र सरकारकडून काही निर्बंध शिथील केले आहेत. अनलॉक 3 च्या नव्या नियमावलीत योग इन्स्टिट्यूट आणि जिमला परवानगी देण्यात आली आहे. बुधवारी 5 ऑगस्टपासून जिम सुरु करता येणार आहे. मात्र त्यांना कडक नियमांचे पालन करणे गरजेचे असणार आहे.
देशभरात काय सुरु, काय बंद?
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास अनुमती
गृह विभागाकडून अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांना अनुमती देण्यात आली आहे. मात्र सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्याशी संबंधित इतर नियमांचं पालन करुन नागरिकांना स्वांतत्र्य दिवस साजरा करता येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांना मास्कचा वापर करणं बंधनकारक असेल. याशिवाय सरकारच्या सर्व गाईडलाईन्सचे पालन करणं गरजेचं असेल, असा आदेश केंद्र सरकारकडून जारी करण्यात आला आहे.
कंटेन्मेंट झोनमध्ये कडकडीत लॉकडाऊन
दरम्यान, कंटेन्मेंट झोन परिसरात 31 ऑगस्टपर्यंत कडकडीत लॉकडाऊन असेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. कंटेन्मेंट झोन परिसरात फक्त अत्यावश्यक सुविधा सुरु राहतील. केंद्रीय गृह खात्याकडून याबाबत महत्त्वाच्या गाईडलाईन्स जारी करण्यात येणार आहेत. (Unlock 3 New Guidelines)
संबंधित बातम्या :
Unlock 3 | देशभरात सिनेमागृह, जिम पुन्हा सुरु होण्याची शक्यता