नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरात अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार 7 सप्टेंबरपासून मेट्रो सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच कंटेन्मेंट झोनच्या बाहेर ओपन थिएटर उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र देशभरातील कंटेन्मेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. आहे. (Unlock-4 Guidelines Metro Train Services to resume)
केंद्राने जाहीर केलेल्या गाईडलाईन्सनुसार, येत्या 7 सप्टेंबरपासून अटी-शर्तींसह मेट्रो सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस मात्र 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. तर ओपन एअर थिएटर हे 21 सप्टेंबरपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय येत्या 21 सप्टेंबरपासून सामजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यक्रमांना 100 लोकांसह परवानगी दिली आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेर लॉकडाऊन लावू नये अशी सूचनाही राज्यांना देण्यात आली आहे.
‘अनलॉक-4’मध्ये काय सुरु, काय बंद?
‘या’ गोष्टी बंदच राहणार
केवळ केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या विमानांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जनजीवन आणि देशातील आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू अनलॉकची प्रक्रिया राबवली जात आहे. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी 1 सप्टेंबरपासून देशात अनलॉक 4 सुरु होणार आहे.
शाळा-कॉलेज बंदच
शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोपावण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील शाळा-कॉलेज बंद आहेत. 1 सप्टेंबरपासून शाळा-कॉलेज सुरु करण्यास परवानगी मिळू शकते. मात्र, शाळा-कॉलेज सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने राज्य सरकारकडे सोपवला आहे. (Unlock-4 Guidelines Metro Train Services to resume)
संबंधित बातम्या :
Unlock-3 Guidelines | ‘अनलॉक-3’च्या गाईडलाईन्स जारी, देशात काय सुरु, काय बंद?