सृष्टी देशमुख देशात पाचवी, यूपीएससी निकालाची संपूर्ण यादी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2018 चा निकाल जाहीर झालाय. कनिष्क कटारिया याने देशातून अव्वल येण्याचा मान मिळवलाय. अक्षत जैन आणि जुनैद अहमद अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्रातून सृष्टी देशमुख ही पहिली आली असून तिचा देशात पाचवा क्रमांक आहे. शिवाय महिला उमेदवारांमध्येही ती पहिली आली आहे.