UPSC परीक्षा पास झाल्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेत काम करायला मिळते. ही नोकरी चांगला पगार, मानमरातब, आणि सुख सुविधांना परिपूर्ण असते. वर्षातून एकदा परदेश प्रवास करायला मिळतो. बंगला, गाडी नोकर चाकर, मुलांना केंद्रिय बोर्डाच्या शाळेत प्रवेश आदि सुखसुविधांचा रेलचेल या नोकरीत असते. अशी सरकारी नोकरी कोणाला नको असेल, म्हणून तर सिव्हील, मेकेनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतरही लोक युपीएससीची परीक्षा देऊन नशीब आजमावितात, किंवा आवडत्या शाखेत जाण्यासाठी पुन्हा पुन्हा युपीएससीची परीक्षा देत असतात. भारतीय प्रशासकीय सेवेत नोकरी मिळविण्यासाठी युपीएससीची परीक्षा पास व्हावे लागते. ही परीक्षा द्यायची असेल तर बारावीनंतरच तयारी करावी लागते. कोणत्याही शाखेचा पदवीधर ही परीक्षा देऊ शकतो. तर या युपीएससी परीक्षेसाठी नेमकी काय तयारी करावी लागते. त्यातील कोणत्या शाखेतील अधिकाऱ्याला किती वेतन असते ते पाहूयात…
युपीएससी ( UPSC ) द्वारा आयोजित विविध परीक्षा आणि पक्रियेतून आपण आयएएस ( IAS – भारतीय प्रसाकीय सेवा ), ( IPS – भारतीय पोलिस सेवा ), ( IES – भारतीय इंजिनिअरींग सेवा ) , ( IRS – भारतीय महसूल सेवा ), ( IFS – भारतीय विदेश सेवा ) आदी सेवांसाठी निवड होते. त्यानंतर अधिकारी बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण होते. परंतू तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की IAS, IPS, IRS, IFS आणि IES मध्ये कशी निवड केली जाते, काय-काय सुविधा मिळतात, किती वेतन असते ? चला पाहूयात काय आहे नेमकी करीयर निवडण्याची प्रक्रिया…
IAS, IPS, IRS, IFS आणि IES सर्व्हीस मध्ये युपीएससी विविध परीक्षा आणि प्रक्रियांच्या माध्यमातूनच निवड होते. चला पाहूयात या शाखांमध्ये कसा प्रवेश मिळतो.
1 ) IAS, IPS, IRS, आणि IES ची निवड लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित विविध परीक्षांद्वारे होते. यासाठी तीन टप्प्यात परीक्षा घेतल्या जातात.
– प्राथमिक परीक्षा ( Preliminary Examination )
– मुख्य परीक्षा ( Main Examination )
– मुलाखत परीक्षा ( Interview/Personality Test )
2) IES साठी निवड UPSC द्वारा आयोजित इंजिनिअरिंग सर्व्हीस परीक्षेच्या माध्यमातून होते. यासाठी देखील तीन टप्प्यात परीक्षा होते.
प्रशिक्षण : निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या संबंधित अकादमीत प्रशिक्षण दिले जाते. उदाहरणार्थ ias साठी उमेदवारांना लाल बहादूर शास्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसूरीत प्रशिक्षण दिले जाते. आणि आयपीएस उमेदवारांना सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी हैदराबाद येथे प्रशिक्षण दिले जाते.
प्रशिक्षण दिल्यानंतर नियुक्ती : प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अधिकाऱ्यांना त्यांच्या सर्व्हीस आणि रॅंकनूसार विविध ठिकाणांवर नियुक्ती दिली जाते. नियुक्तीचे ठिकाण आणि कार्यभार सर्व्हीसची आवश्यकता आणि अधिकाऱ्याची प्राथमिकता त्या आधारे दिले जाते. याच प्रकारे upsc च्या परीक्षेच्या माध्यमातून योग्य उमेदवारांना विविध सिव्हील सर्व्हीस आणि इंजिनिअरिंग सर्व्हीसमध्ये नियुक्ती दिली जाते.
IAS, IPS, IRS, IFS, आणि IES अधिकाऱ्यांचे वेतन त्यांचे पद आणि अनुभव याच्या आधारावर वेगवेगळे असू शकते. परंतू अधिकाऱ्यांच्या प्राथमिक वेतनाचा विचार केला तर सर्वांना सुमारे 56,100 रुपये प्रति महिना बेसिक वेतन ) + अन्य भत्ते ( उदा. DA, HRA ) असतात. या शिवाय वेळोवेळी अनुभव आणि बढती आधारावर वेतन वाढत राहते. अन्य अनेक सुविधा देखील मिळत असतात.
IAS, IPS, IRS, IFS आणि IES अधिकाऱ्यांना अनेक प्रकारच्या सोयी आणि सुविधा मिळतात. त्यांना मिळणाऱ्या सुविधा पदांनुसार वेगवेगळ्या असू शकतात. खास बाब म्हणजे या सुविधांच्या शिवाय या सर्व्हीसमधील अधिकाऱ्यांना उच्च स्तराचे सामाजिक सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते. चला पाहूयात काय सुविधा मिळतात.
सरकारी घर : प्रमुख शहरात मोठे आणि सुव्यवस्थित सरकारी घर
सरकारी वाहन : ड्रायव्हरसह सरकारी वाहन
मेडीकल सुविधा : स्वत:साठी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी सरकारी रुग्णालयात आरोग्य सुविधा
सुरक्षा : आवश्यकतेनूसार सुरक्षा कर्मचारी
सहायक कर्मचारी : ऑफीस आणि घर कामासाठी सहायक कर्मचारी
सबसिडीच्या दरात वीज आणि टेलिफोन : वीज आणि टेलिफोन बिलात सूट
परदेश प्रवास : सरकारी कामासाठी परदेश प्रवासाची सोय
पेंशन – सेवानिवृत्तीनंतर पेंशन आणि निवृत्तीनंतरचे लाभ
सरकारी घर : प्रमुख शहरात सरकारी घर
सरकारी वाहन : काही पदांसाठी वाहनाची सोय
मेडिकल सुविधा : स्वत:ला आणि कुटुंबासाठी उपचाराची सोय
सहायक कर्मचारी : काही पदांवर ऑफीसच्या कामासाठी
परदेश प्रवास : सरकारी कामासाठी परदेश प्रवास
पेंशन : सेवानिवृत्तीनंतर पेंशन आणि अन्य निवृत्तीचे लाभ
परदेशात घर : परदेशात उच्च दर्जाचे घर
सरकारी वाहन : ड्रायव्हरसह वाहन
मेडीकल सुविधा : स्वत:साठी आणि कुटुंबासाठी उच्चस्तरीय वैद्यकीय उपचाराची सोय
परदेश प्रवास : नियमित स्वरुपात परदेश प्रवासाची सुविधा
शिक्षण : मुलांच्या शिक्षणासाठी विशेष सोय
सहायक कर्मचारी : कार्यालय आणि घरातील कामासाठी नोकरचाकर
पेंशन : सेवानिवृत्तीनंतर पेंशन आणि अन्य निवृत्तीचे लाभ
सरकारी घर : प्रमुख शहरात सरकारी घर
सरकारी वाहन : काही पदांसाठी वाहनाची सोय
आरोग्य सुविधा : स्वत:साठी आणि कुटुंबासाठी आरोग्य उपचाराची सोय
सहायक कर्मचारी : काही पदासाठी ऑफीस कामासाठी नोकरचाकर
परदेश प्रवास : सरकारी कामासाठी परदेश प्रवासाची सोय
पेंशन : सेवानिवृत्तीनंतर पेंशन आणि अन्य निवृत्तीचे लाभ
पेपर – 1 : सामान्य ज्ञान ( 200 गुण )
पेपर – 2 : सिव्हील सर्व्हीस एप्टीट्यूड टेस्ट ( 200 गुण ) ( हा क्वालीफाईंग पेपर आहे, यात किमान 33 टक्के गुण आवश्यक )
पेपर A : अनिर्वाय भारतीय भाषा ( 300 गुण ) ( क्लालीफाईंग पेपर )
पेपर B : इंग्रजी ( 300 गुण ) ( क्वालीफाईंग पेपर )
पेपर I : निबंध ( 250 गुण )
पेपर II ते V : सामान्य ज्ञान ( 250 गुण प्रत्येकी )
पेपर V आणि VII : वैकल्पिक विषय ( 250 गुण प्रत्येकी )
मुलाखत ( 200 गुण ) मुख्य परीक्षा आणि मुलाखत याच्या गुणांआधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते.
दरवर्षी देशभरातून आठ ते नऊ लाख लोक UPSC नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज भरतात. ही संख्या दरवर्षी बदलू शकते, परंतु सरासरी 8-10 लाख उमेदवार UPSC प्राथमिक परीक्षेसाठी अर्ज करतात. यापैकी, सुमारे 50% उमेदवार प्रत्यक्षात परीक्षेला बसतात. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार मुख्य परीक्षेसाठी आणि त्यानंतर मुलाखतीसाठी पात्र ठरतात. शेवटी, केवळ एक हजार उमेदवारांना अंतिम यादीत स्थान मिळते. UPSC परीक्षेचा अभ्यासक्रम व्यापक आणि परीक्षा खूप कठीण मानली जाते आणि त्यासाठी खूप मेहनत आणि संयम आवश्यक असतो.