वॉशिंग्टन : अमेरिकेतील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डेमॉक्रेटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांना अगदी एकतर्फी विजयाचा विश्वास होता. मात्र, आता मतमोजणीदरम्यान दोघांच्या मतांच्या टक्केवारीत केवळ 1 टक्क्याचा फरक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेल्या मतांचा आणि आकडेवारीचा विचार केला तर ट्रम्प निवडणुकीत पराभूत झाले तरी त्यांचं रिपब्लिकन पक्षातील स्थान अढळ राहणार आहे असंच दिसतंय (US Election 2020 Donald Trumps defeat might decided but republicans not).
विशेष म्हणजे डेमॉक्रेटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकत असल्याचं दिसत असलं तरी सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकनची ताकद वाढताना दिसतेय. त्यामुळे विजयानंतरही बायडन यांच्या डोकेदुखीत वाढच होणार आहे. 2008 मध्ये डेमॉक्रेटीककडून बराक ओबामा मैदानात होते, तर रिपब्लिकनकडून जॉर्ज बुश उमेदवार होते. यावेळी ओबामा यांनी बुश यांचा खूप मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्याचा विचार करता ट्रम्प यांचा पराभव सन्मानजनक असणार आहे. विशेष म्हणजे सिनेटमध्ये देखील त्यांना मजबूत संख्या मिळताना दिसत आहे.
2020 च्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने सिनेटमध्ये बहुमत मिळवण्याकडे वाटचाल केली आहे. यासोबतच अमेरिकेच्या संसदेतही त्याची संख्या चांगली आहे. याशिवाय ट्रम्प यांनी न्यायपालिकेतही मोठे बदल केले आहेत. सध्या अमेरिकन न्यायालयांच्या सक्रीय न्यायाधीशांपैकी एक तृतीयांश न्यायाधीशांना ट्रम्प यांनीच नियुक्त केलं आहे.
अमेरिकेत कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने आपल्या पहिल्या कार्यकाळात फेडरल सर्किट आणि जिल्हा न्यायाधीशांच्या नामनिर्देशनात देखील ट्रम्प पुढे आहेत. या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एमी कोनी बॅरेट यांनाही ट्रम्प यांनीच नामनिर्देशित केले. त्यांचा नुकताच ऑक्टोबरमध्ये शपथविधी देखील झाला. सध्या अमेरिकेच्या न्यायालयात कॉन्झर्व्हेटीव्ह न्यायाधीशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता सिनेटमध्ये देखील रिपब्लिकनला बहुमत मिळाल्यास जो बायडन आणि डेमॉक्रेट्सला विजयानंतर देखील आपली धोरणं राबवताना आणि विधेयकं संमत करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणरा आहे.
अशाप्रकारे ट्रम्प यांचा पराभूव झाला तरी त्यांच्या राजकीय करिअरवर कोणतंही संकट नसणार आहे. कारण ट्रम्प यांनी या निवडणुकीत आपला मतदारांची संख्या चांगलीच वाढवली आहे. या निवडणुकीत ट्रम्प यांनी कामगारांचा प्रदेश असलेल्या लॅटिन अमेरिकेत आपली मतांची संख्या चांगलीच वाढवली आहे. त्यांनी फ्लोरिडासारख्या रणमैदानी स्विंग स्टेटमध्ये देखील विजय मिळवला आहे.ट्रम्प यांना मतदान करणाऱ्यांमध्ये केवळ गोऱ्या अमेरिकन नागरिकांचाच समावेश नाही, तर कामगार आणि अल्पसंख्यांक या सर्वांचा आहे.
संबंधित बातम्या :
US Election 2020: मतदान होऊन 3 दिवस उलटले, अमेरिकेतील निकाल कधी लागणार?
US Election : डोनाल्ड ट्रम्पना झटका, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका
US Election 2020 : जय-पराजयाचा फैसला मी किंवा बायडन नव्हे, तर न्यायमूर्ती करणार : डोनाल्ड ट्रम्प
US Election 2020 Donald Trumps defeat might decided but republicans not