गांधीनगर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर (Donald Trump message on visitor’s book at Sabarmati Ashram) आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया, मुलगी इवांका ट्रम्प आणि जावई जेरेड कुशनरसोबत भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांनी अहमदाबादमधील साबरमती आश्रमला भेट दिली. या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आश्रमातील व्हिजीटर्स बूकमध्ये संदेश (Donald Trump message on visitor’s book at Sabarmati Ashram) लिहिला.
यात ट्रम्प यांनी To My Great Friend Prime Minister Narendra Modi Thank You For This Wonderful Visit असा संदेश लिहिला आहे. “माझ्या महान मित्रा पंतप्रधान मोदी या सुंदर भेटीसाठी आभार,” असा याचा अर्थ (Donald Trump message on visitor’s book at Sabarmati Ashram) आहे.
पंतप्रधान मोदी स्वागतासाठी विमानतळावर
डोनाल्ड ट्रम्प हे सकाळी 11.40 ला अहमदाबादच्या सरदार वल्लभ भाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचं स्वागत केले. त्यानंतर भव्य रोड शो नंतर 12.31 च्या सुमारास ट्रम्प साबरमती आश्रमात पोहोचले.
Gujarat: US President Donald Trump writes a message in the visitors’ book at the Sabarmati Ashram, ‘To my great friend Prime Minister Modi…Thank You, Wonderful Visit!’ pic.twitter.com/mxpJbSMg4W
— ANI (@ANI) February 24, 2020
या ठिकाणी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया यांनी चरखा चालवला.
US President Donald Trump and First Lady Melania Trump write in the visitor’s book at Sabarmati Ashram pic.twitter.com/WtHCddENkA
— ANI (@ANI) February 24, 2020
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी भारत सज्ज
ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व ट्रम्प यांच्या स्वागताची तयारी करत आहेत. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प जेव्हा विमानतळावरुन मोटेरा स्टेडियमजवळ पोहोचतील तेव्हा रोड शो दरम्यान शाळेतील विद्यार्थी निरनिराळे कार्यक्रम सादर करण्यात आले. रोड शो दरम्यान गरबा, देशभक्तीपर गाणी, जवानांच्या वेशभूषेत कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमांचं सादरीकरण झाले.