वॉशिंग्टन : चीनला गंभीर परिणामांना सामोरं जावे लागेल, असे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. आंतरराष्ट्रीय समुदाय आणि जागतिक आरोग्य संघटनेला ‘कोरोना’ व्हायरससंदर्भात चुकीची माहिती दिल्याचा आरोप अमेरिकेने चीनवर केला आहे. (Donald Trump hints at consequences for China for misinformation on corona)
व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं डोनाल्ड ट्रम्प यांना चीनसंदर्भात प्रश्न विचारले. चीनला अद्याप परिणाम भोगावे का लागले नाहीत, अशी वारंवार विचारणा पत्रकाराने केली. यावर उत्तर देताना ‘कोणतेही परिणाम झालेले नाहीत, हे तुम्हाला कसे माहित?’ असा प्रतिप्रश्न ट्रम्प यांनी विचारला. “मी काही सांगणार नाही. चीन शोधून काढेल. मी तुम्हाला का सांगू?” अशी पुस्ती ट्रम्प यांनी जोडली.
चीनच्या वुहान शहरातूनच कोरोना व्हायरसचा जगभरात प्रसार झाला आहे, याबाबत कोणतीही शंका नसल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. कोरोना व्हायरसचे संकट लपवण्यासाठी चीनने काही आठवड्यांपूर्वी एक खोटी मोहीम राबवली. त्यामुळे उर्वरित जगात कोरोनाचा प्रसार झाला, असा आरोप कॉंग्रेस नेत्या एलिस स्टेफॅनिक यांनी केला.
आम्ही चीनवर बऱ्याच अंशी अवलंबून होतो. पण आता उत्पादकांना औषध आणि वैद्यकीय उपकरणांचे कार्यक्षमपणे देशांतर्गत उत्पादन करण्यास सक्षम बनवण्याची वेळ आली आहे’ असंही त्या म्हणाल्या.
She asks:Why are there no consequences for China? ??
.@realDonaldTrump How do you know there are no consequences?
??China will find out??
?You’d probably be the last person on Earth I would tell (Donald Trump hints at consequences for China for misinformation on corona)
? Love My President ?pic.twitter.com/TZPF9AmzO2
— Constitutional Republic TEXT TRUMP 88022 (@CRRJA5) April 14, 2020
याआधीही, डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटना अर्थात ‘WHO’वर अरेरावी केली होती. ‘कोरोना’ साथीच्या प्रादुर्भावाच्या काळात ‘WHO’ला चीनचा खूपच पुळका येत असल्याचं सांगत ट्रम्प यांनी थेट निधी रोखण्याचा इशारा दिला होता.
संयुक्त राष्ट्रसंघाची आरोग्य संघटना असलेल्या ‘WHO’ ला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी पुरवला जातो. मात्र या निधीवर वचक ठेवण्याचा इशारा ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना दिला होता. “मी ते करणार आहे, असे म्हणत नाही” असं सूचक वक्तव्य ट्रम्प यांनी पुढे केलं होतं.
‘जागतिक आरोग्य संघटना’ चीनबद्दल खूप पक्षपाती असल्याचे दिसते. हे बरोबर नाही. ‘WHO’ खूपच चीन केंद्रित आहे’, असा आरोपही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.
(Donald Trump hints at consequences for China for misinformation on corona)