वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) कायमच चर्चेत असतात. कधी कोरोना विषाणूवर केलेल्या वक्तव्यावरुन, कधी मास्क न लावण्यावरुन, तर कधी आपल्या गमतीशीर डान्सवरुन सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरुच असते. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यात ट्रम्प आपल्या हातातील नोटा मोजत असल्याचं दिसत आहे (US president Donald Trump photo of counting money goes viral).
आपल्या शेवटच्या प्रेसिडेंशिअल डिबेटआधी 19 ऑक्टोबरला ट्रम्प लॉस वेगासच्या आंतरराष्ट्रीय चर्चमध्ये गेले होते. मात्र, या दौऱ्यात त्यांचा एक फोटो चांगलाच चर्चेचा विषय बनला. ट्रम्प अगदीच मोजक्यावेळी चर्चमध्ये जाताना दिसले आहेत. हा एक इनडोअर कार्यक्रम होता. यात ट्रम्प विना मास्क आले. त्यानंतर त्यांचा चर्चमधील हा दुर्मिळ फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला. हा फोटो चर्चमध्ये दान करण्याआधी बिलं मोजतानाचा आहे.
U.S. President Donald Trump counts money before donating it as he attends services at the International Church of Las Vegas Service in Las Vegas, Nevada.
REUTERS/Carlos Barria @ReutersBarria pic.twitter.com/GkMDMogDqG— Jim Bourg (@jimbourg) October 18, 2020
रॉयटर्सचे फोटोग्राफर कार्लोस बॅरिया यांनी ट्रम्प यांचा संबंधित फोटो क्लिक केलाय. यात ते पैसे मोजत असल्याचं दिसत आहे. हा फोटो चर्चमध्ये दान करण्याआधी एका खुर्चीवर बसून बिलं मोजण्याचा आहे. हा फोटो लवकरच सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर लोक ‘चेंज फॉर चेंज’ अशा कॅप्शनसह शेअर होत आहे. या फोटोवर लोक अनेक मजेशीर कमेंट करत आहेत. इंटरनेटवर या फोटोशी संबंधित मीम्स आणि जोक्सही व्हायरल होत आहेत.
A “billionaire” who can only donate $20. Such charity. Wow!
— Liberal Wombat in TX (@LiberalWombat) October 18, 2020
He’s thinking,…..with my losses they should be giving me money
— Lawrence Connolly (@LawrenceConnol2) October 18, 2020
हेही वाचा :
Powerfull Country : जगातील सर्वात शक्तीशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर
Donald Trump | पराभव झाल्यास देश सोडून जावं लागेल, ट्रम्प यांची भावनिक साद
Donald Trump | ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, अकाऊंट ब्लॉक
US president Donald Trump photo of counting money goes viral